महागाईविरोधात ब्रम्हपूरी तालुका काँग्रेसचे सायकल रॅली आंदोलन.
ब्रम्हपूरी ता.प्र. दि. १२ जुलै
मनोज अगळे 9765874115
केंद्रातील मोदी सरकारने कृत्रिम महागाई निर्माण करून सामान्य जनतेला आर्थिकदृष्ट्या कमकुवत केले आहे. या सामान्य माणसाच्या वेदना दिल्लीच्या सरकारपर्यंत पोहवण्यासाठी तसेच सामान्य जनतेच्या हक्कासाठी ऊन पावसाची तमा न बाळगता काँग्रेस पक्ष मोदी सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरला आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस व जिवनावश्यक वस्तूंच्या किंमती भरमसाठ वाढवल्याने सर्व प्रकारची महागाई वाढली असून लोकांचे जगणे मुश्कील झाले आहे. सरकारचे अपयश झाकण्यासाठी मंत्रीमंडळातील चेहरे बदलून चालणार नाही तर पंतप्रधानच बदलण्याची गरज आहे, अशी घणाघाती टीका करण्यात येत आहे.
इंधन दरवाढ व महागाईविरोधात ब्रम्हपूरी तालुका काँग्रेसने आज तालुक्याच्या ठिकाणी सायकल रॅली काढून मोदी सरकारचा निषेध केला.
यावेळी ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस कमेटिचे अध्यक्ष खेमराज तिडके, काँग्रेस कमेटिचे कार्याध्यक्ष प्रभाकर सेलोकर, जि.प.सदस्य डॉ. राजेश कांबळे, जि.प.सदस्य प्रमोद चिमुरकर, जि.प.सदस्य स्मिताताई पारधी, नगरसेविका सौ.सुनीताताई तिडके, नगरसेविका सौ. सरीताताई पारधी, नगरसेविका सौ. लताताई ठाकुर, नगरसेविका सौ. वनिताताई अलगदेवे, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा मंगलताई लोनबले, शहर काँग्रेसच्या अध्यक्षा योगीताताई आमले, पं.स.सदस्य थानेश्वर कायरकर, शहर काँग्रेस कमेटिचे अध्यक्ष तथा नगरसेवक हितेंद्र राऊत, सुधा राऊत, गीता मेश्राम, किसान काँग्रेस सेलचे अध्यक्ष नानाजी तुपट, चिमुर विधानसभा ब्रम्हपुरी तालुका विभाग अध्यक्ष काशिनाथ खरकाटे, जगदीश तलमले, सुधीर पंदीलवार, माजी सभापती कृ.उ.बा.स. मोरेश्वर पत्रे, राजेश तलमले, वामन मिसार, दिवाकर मातेरे, नरेश सहारे, गुड्डु बगमारे,भास्कर सोनोने, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रुपेश बानबले,हेमंत सेलोकर, माजी नगरसेवक जगदीश आमले, नगरपरीषदेचे माजी उपाध्यक्ष नारायण मेश्राम, नंदकिशोर गुड्डेवार, सोमाजी उपासे, किशोर राऊत, यशवंत राऊत, गुरूदेव वाघरे, प्रमोद सातपुते, सुर्यभान धोटे, अमोल सलामे, नंदु भानारकर, सुरेश वंजारी यांसह अन्य काँग्रेसचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
केंद्रातील नरेंद्र मोदी यांचे जुलमी, अत्याचारी सरकारमुळे जनतेचे जगणे मुश्कील झाले आहे. शेजारच्या देशात भारत ३० रुपयांनी पेट्रोल व २२ रुपयांनी डिझेल देते आणि आपल्याच लोकांना १०० रुपयांना का? हे अन्यायी मोदी सरकार उखडून फेकण्यासाठी काँग्रेस पक्ष राज्यभरात रस्त्यावर उतरून सामान्य जनतेसाठी संघर्ष करत आहे.

