मुसळधार पावसामुळे कोसरसार नाल्याला पूर बोडखा या गावाचा संपर्क तुटला
वरोरा तालुका प्रतिनिधी
गणेश उराडेे 8928860058
वरोरा:- संपूर्ण महाराष्ट्रात काल पासून मुसळधार पावसाने आगमन केले काल पासून मुसळधार पाऊस चालू आहे आज वरोरा तालुक्यातील कोसरसार या नाल्याला पूर येऊन बोडखा या गावचा संपर्क तुटला आहे. काही दिवसआधी नाला खोलीकरण करण्यात यावे या साठी ग्रामपंचायतिने चंद्रपूर जिल्हापरिषदे मध्ये निवेदन देले होते नालाखोलीकर केले नाही तर गावाला पुरा पासून धोका आहे असे त्यात नमूद केले होते प्रशासनाने त्या निवेदनाची दाखल घेऊन शेतकर्यांचे होणारे नुकसान थांबवावे अशी मागणी गावकऱ्या कडून होत आहे
