ब्रम्हपूरी पंचायत समितीच्या वतीने गांगलवाडी येथे कृषी संजीवनी कार्यक्रमाचे समारोप

 ब्रम्हपूरी पंचायत समितीच्या वतीने गांगलवाडी येथे कृषी संजीवनी कार्यक्रमाचे समारोप


महाराष्ट्राच्या जडणघडणीत वसंतराव नाईकांचे अमुल्य योगदान.

          -- थानेश्वर कायरकर.


ब्रम्हपुरी (ता.प्र) :-- १ जुलै २०२१

*मनोज अगळे*

*9765874115*

   


        ब्रम्हपूरी पंचायत समितिच्या वतिने

 गांगलवाडी येथे कृषीक्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्य कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समिती सभापती रामलाल दोनाडकर यांच्या हस्ते, पं.स.उपसभापती सौ सुनिता ठवकर, यांचे अध्यक्षतेखाली, पंचायत समिती सदस्य थानेश्वर पाटील कायरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत *कृषी संजीवनी सप्ताहाचे समारोप* कार्यक्रम आयोजन करण्यात आले. 

           या प्रसंगी मार्गदर्शन करताना पंचायत समिती सदस्य थानेश्वर पाटील कायरकर म्हणाले महाराष्ट्राला यशोशिखरावर पोहचविण्यासाठी अनेकांनी परिश्रम घेतले आहेत. महाराष्ट्राच्या या जडणघडणीत महाराष्ट्राचे तिसरे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे अमुल्य योगदान राहिले आहे. त्यांनी आपल्या राज्याला खऱ्या अर्थाने सुजलाम, सुफलाम केले आहे. ते महात्मा फुलेंच्या विचाराने प्रेरित होते. कृषी क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय काम केले. त्यामुळेच राज्य अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाले आहे. चीन, जपान, सिंगापूर, श्रीलंका येथे दौरे करून शेतीपिकांच्या संकरित वाणांची महाराष्ट्राला ओळख करून दिली. त्यांच्या प्रयत्नाने कापूस हे नगदी पीक शेतकऱ्यांच्या हाती आले. त्यांनी सहकारी उद्योगाचे जाळे उभे केले. त्यांनी राज्यात पंचायतराज कायद्याची मुहूर्तमेढ रोवून सत्तेचे विकेंद्रीकरण केले, दुध डेअरी, रोजगार हमी योजना यशस्वीपणे राबविली आणि विकास गंगा खेड्यापाड्यांत पोहचवली.

           या प्रसंगी गटविकास अधिकारी डॉ. शिरीष रामटेके, तालुका कृषी अधिकारी खंडाळे, गांगलवाडी ग्रामपंचायत प्र. सरपंच बावणे, कृषीभुषन सौ मालती कुथे, तालुका कृषी अधिकारी (प.स.) घनशाम पसारे, मंडळ कृषी अधिकारी बालपांडे, ग्रामविकास अधिकारी मेश्राम, कृषी सहायक धोंगडे, कृषी सहायक आत्राम, यासह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler