त्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तीन गावातील सरपंच आले एकत्र,

त्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तीन गावातील सरपंच आले एकत्र, 


प्रतिनिधी:-प्रविण वाघे

मो, 7038115037



तळोधी बाः अप्पर तालुक्यात येत असलेल्या सावर्ला ते गंगासागर हेटी,आकापुर व उश्राळमेंढा रोड जड वाहतूकीमुळे पुर्णपणे उखडला होता .एक महिण्याअगोदर या मार्गाचे संबंधित विभागाकडून डांबरीकरण करण्यात आले.

मात्र डांबरीकरणालगत साईड बंब न भरल्याने वाहनधारकांना जीव मुठीत ठेवून या मार्गाने प्रवास करावा लागते .आकापूर,गंगासागर हेटी व उश्राळमेंढा या मार्गाने बससेवा सुध्दा सुरू असते. या तिन्ही गावाचा मुख्य संपर्क तळोधी बा.शहराशी येत असल्याने नेहमी बाजारपेठ करीता दुचाकी व चारचाकी वाहने या मार्गाने धावत असतात .मात्र नव्याने तयार केलेल्या डांबरिकरणालगत मुरुमाचे साईड बंब न भरल्यामुळे रस्ता अरुंद झाले आहे ,त्यामुळे विरुध्द दिसेने चारचाकी वाहन आल्यास वाहने एकमेकांना मागेपुढे घेत साईड दयावी लागते. यामुळे नागरिकांना या मार्गाने प्रवास करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास होत आहे .त्या मुळे तिन्ही गावच्या सरपंच व गावकरी वर्गानी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता व नागभीड तहसिलदार यांना संबंधित रस्त्याबदलचे निवेदन देण्यात आले.अन्यथा आंदोलन करण्याचा ईशारा देण्यात आला.

यावेळी उश्राळमेंढा सरपंच हेंमत लाजेवार, गंगासागरहेटी सरपंच दिलीप गायकवाड व आकापूर सरपंच कृणाल निकुरे व गावकरी वर्ग यावेळी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler