बँक ऑफ इंडिया ची एटीएम सुविधा तात्काळ सुरू करा-शिवसंग्राम
----------------------------------------
शिवसंग्राम संघटनेचा आंदोलनाचा इशारा
चंद्रभान झिने| तालुका प्रतिनिधी
देऊळगाव राजा:
शहरातील बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन अनेक महिण्यापासून बंद आहे.परिणामी बँक ग्राहकांना तात्काळचा आर्थिक व्यवहार करतांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने नागरिकांना मध्ये असंतोष वाढत आहे.देऊळगावराजा शहरात बँक ऑफ इडिया चे एटीएम सुविधा तात्काळ उपलब्द करण्यात यावी,अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे निवेदन आज येथील बँक प्रशासनाला शिवसंग्राम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले आहे.
निवेदनात नमूद आहे की,गत काही महिन्या पासून शहरात बँक ऑफ इंडिया चे एटीएम बंद पडले आहे.त्यामुळे बँक ग्राहकांना आर्थिक व्यवहार करण्यात अडचण निर्माण होत आहे.एटीएम सुविधा मिळत नसल्याने ग्राहकांमध्ये असंतोष वाढत आहे.त्यात शहरात एटीएम सुविधा उपलब्द नसल्याने नवीन एटीएम कार्ड धारकांना एटीएम पिन जनरेट करण्यासाठी जालना येथे ३० किमी अंतरावर जावे लागत असल्याने ग्राहकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो.शहरात व परिसरात बँक ऑफ इंडियाचे ग्राहक वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांना व्यवहार करण्यास अडचण निर्माण होऊ नये म्हणून याठिकाणी एटीएम सुविधा असणे अत्यंत गरजे झाले आहे.शिवाय एटीएम सुविधेमुळे बँकेत गर्दी देखील कमी होईल परिणामी कोरोनाचा संसर्ग होणार नाही.मात्र शहरात बँक ऑफ इंडियाचे एटीएम सुविधा उपलब्द नसल्याने ग्राहकांना तात्काळचे ऑनलाइन व्यवहार करता येत नाही.त्यामुळे देऊळगावराजा शहरात तात्काळ बँक ऑफ इंडिया ची एटीएम सुविधा उपलब्द करण्यात यावी,अन्यथा बँक प्रशासनाच्या विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा बँक प्रशासनाला शिवसंग्राम संघटनेचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे,जहिर पठाण,अजमत खान, संतोष हिवाळे,निलेश गीते,चंद्रभान झिने आदींनी दिला आहे.
