‘नवोदय’ प्रवेश परीक्षा होणार; परीक्षेच्या तारखा जाहीर!

‘नवोदय’ प्रवेश परीक्षा होणार; परीक्षेच्या तारखा जाहीर!

 

चिमुर तलुका ग्रामीण प्रतिनिधी 

सचिन वाघे नेरी 9673757006


नवोदय विद्यालय समिती एन व्ही एस ने JNVST 2021 साठी 6 विच्या प्रवेश परीक्षेच्या तारखांची नुकतीच घोषणा केलीय. जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षा 11 ऑगस्ट 2021 रोजी बुधवारला घेण्यात येणार आहे . सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात कोविड प्रोटोकॉलनुसार, प्रवेश परीक्षा घेण्यात येणार असल्याने NVEST ने स्पष्ट केले. त्यामध्ये एकूण 2,41,7009 उमेदवारांनी निवड चाचणीसाठी नोंदणी केली असून यापैकी 11,182 केंद्रामध्ये 47,320 उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. याबाबत शिक्षण मंत्रालयाने एका द्रवीट्द्वारे‌ ही माहिती दिलीय. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांतल्या जवाहर नवोदय विद्यालयातील सत्र 2021-2022 चा वर्ग 6 मधील प्रवेशाकरिता विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी जवाहर नवोदय निवड परीक्षा 11 ऑगस्ट 2021 रोजी बुधवारला घेतली जाणार आहे. ही परीक्षा दोनदा पुढे ढकलण्यात आली होती.

सर्व नोंदणीकृत विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की पूर्ण निर्धारित तारखेनुसार परीक्षेकरिता प्रवेशपत्र डाऊनलोड करावीत तसेच प्रवेश पत्रामध्ये दिलेल्या परीक्षा केंद्रावर प्रस्तुत करावीत. सर्व परीक्षार्थींना प्रवेश पत्रामध्ये दिलेल्या को्विड संबंधित दिशा निर्देशांचे पालन करणे अनिवार्य आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler