एस. आर के कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे महामार्गावरील शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान
वरोरा तालुका प्रतिनिधी
गणेश उराडे 8928860058
वरोरा :-वरोरा चिमूर राष्ट्रीय मार्गावरील वरोरा वरून 3 कि. मी. अंतरावर परसोडा या गावाजवळ खैरगाव या गावावरून एक छोटा नाला परसोडा या गावाच्या दिशेने आहे वरोरा चिमूर रोड चे काम गेल्या चार वर्षा पासून चालू आहे परसोडा या गावाजवळ रोड वर पूल आहे त्या पुलाचे SRK कंपनी नि पावसाळा पाहताच पूल बांधणी चे काम चालू केले आता पावसाचा जोर वाढल्यामुळे पूला साठी खोदलेल्या खड्ड्यात पाणी साचलेले आहे त्या मुळे त्या ठिकाणी काम करणे शक्य नसल्यामुळे ते काम अपूर्ण आहे आणि त्यामुळे खैरगाव आणि परसोडा या गावातील शेतकऱ्यांची शेती महामार्गाला लागून असल्यामुळे त्या रोडवरच्या पाणी शेतकऱ्याच्या शेतात जाऊन उभ्या असलेल्या पिकात घुसत आहे आणि खैरगाव लागत असलेले तळे 100% पावसाने भरल्याने ते पाणी रोडवर येऊन शेतात घुसत आहे कम्पनी प्रशासनाने तळ्यातील पाणी बाहेर काढण्यासाठी कुठलाही पर्यायी ववस्ता केली नसल्यामुळे महामार्गानी ये जा करणाऱ्या प्रवाशांचे अपघात या रोड नि होत आहे. कम्पनी प्रशासनाने लवकर तो पूल उभारावा व शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकाची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात यावी अशी मागणी शुभम आमने (अध्यक्ष) गुरुदेव सेवा मंडळ, परसोडा व वरोरा तालुका सचिव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक युवती विचार मंच ,महाराष्ट्र राज्य यांनी केली आहे
