अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळ गडचिरोली च्या वतीने जिल्हा प्रचारक स्व, जयरामजी मुंगसूजी खोबरागडे यांना श्रद्धांजली अर्पण.

अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळ गडचिरोली च्या वतीने जिल्हा प्रचारक स्व, जयरामजी मुंगसूजी खोबरागडे यांना श्रद्धांजली अर्पण.

गडचिरोली शहर प्रतिनिधी

संदीप कांबळे 9421318021




  गडचिरोली जिल्ह्यामध्ये गुरुदेव सेवा मंडळाच्या विविध ठिकाणी शाखा उघडण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या कार्याचा , तत्वज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी त्यांची धडपड अत्यंत उल्लेखनीय होती. दरवर्षी एप्रिल महिन्यामध्ये ग्राम जयंती साजरी करण्यासाठी प्रचार रथाद्वारे आपल्या सहकाऱ्यांसह जिल्हाभर दौरा करून प्रचार करीत असत. तसेच मार्कंडादेव यात्रेच्या वेळी दरवर्षी गडचिरोली ते मार्कंडादेव येथे पदयात्रेचे द्वारे प्रचार चमू मंडळाच्या झेंड्यासह मार्गक्रमणा करून तसेच मार्गात आलेल्या विविध मोठ्या ठिकाणी प्रचार सभेद्वारे नागरिकांना मार्गदर्शन करण्याचे कार्य चालवीत असत. त्याकरिता जिल्हासेवाधिकारी आदरणीय डॉक्टर शिवनाथजी कुंभारे साहेब, आदरणीय सुरेश पद्मशाली साहेब यांनी दरवर्षी आर्थिक सहकार्य करीत असत. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात त्यांचे अनेक स्नेही तयार झालेले आहेत. याप्रसंगी सर्वच मुखातून गुरुदेव सेवा मंडदाचा सचा कार्यकर्ता हरपला असे दिसत होते, याप्रसंगी अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळ शाखा रामनगर गडचिरोलीचे वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

              या श्रद्धांजली प्रसंगी श्री डॉ, शिवनाथ कुंभारे साहेब,श्री ,अरविंद पाटील वासकर, श्री सुखदेव जी वाटे, सुरेश मंडवगडे,श्री नानाजी वाढई महाराज,श्री किशोर खोबरगडे, श्री संदीप कांबळे, श्री,वासुदेव तडसे सर ,व अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळ शाखा रामनगर गडचिरोली व अनेक गाव गावातील गुरुदेव भक्त हजर होते,,

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler