भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी सशक्त व मजबूत बुथ समिती तयार करावी - नगराध्यक्ष सौ. योगिताताई पिपरे
भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहराच्या वतीने फुलेवार्ड बुथ क्र. ९८ येथे बुथ कमेटीची बैठक
संदीप कांबळे 9421318021
गडचिरोली शहर प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी तर्फे १ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट या दरम्यान समर्थ बूथ अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.
भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहराच्या वतीने शहरातील फुलेवार्ड येथील बूथ क्र. ९८ मध्ये बूथ कमेटीची बैठक घेण्यात आली. बुथ अभियान हे भाजपाच्या कार्यप्रणालीचा महत्वपूर्ण भाग असुन ज्याने बुथ जिंकला त्याने निवडणूक जिंकली हे ब्रीदवाक्य लक्षात ठेवुन प्रत्येक कार्यकर्त्यांनी सशक्त व मजबुत बुथ समिती तयार करावी असे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना नगराध्यक्ष सौ. योगिताताई पिपरे बोलत होत्या.
यावेळी शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे,महिला आघाडी तालुका अध्यक्ष दुर्गा काटवे,रश्मी बाणमारे,पुनम हेमके,अमित हेमके,सोनाली भडांगे,पूनम भडांगे,अमोल भडांगे,रोशन कपाटे,करिष्मा भंडारे,पुजा मरलवार,हर्षला बारापात्रे,निलेश हेमके,पौर्णिमा वाळके,दिलीप धात्रक,विजया धात्रक,संजय नरकर,कामिनी पटेल,रुची हेमके,प्रिती हर्षे शिंधु भडांगे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

