महाआवास योजनेत ग्रामपंचायत कोसरसार राज्यात प्रथम
वरोरा तालुका प्रतिनिधी
गणेश उराडे 8928860058
वरोरा:- राज्य व्यवस्थापन कक्ष- ग्रामीण रमाई गृहनिर्माण प्रधानमंत्री आवास योजना २०-२१ मध्ये राज्यपुरस्कृत अभियानात ग्रामपंचायत कोसरसार या ग्रामपंचायत नी प्रथम क्रमांक पटकाविला वरोरा- भद्रावती विधानसभेच्या आमदार सौ. प्रतिभाताई धानोरकर व पंचायत समिती सभापती श्री रवींद्र धोपटे उपसभापती संजीवनी भोयर माजी सभापती तथा सदस्य रोहिणी देवतळे सवर्ग विकास अधिकारी बोबडे साहेब यांच्या हस्ते ग्रामपंचायत उपसरपंच अमित बहादूरे व सचिव राजकुमार दुर्गे यांना प्रसस्तीपत्र व सिल्ड देऊन सत्कार करण्यात आला ग्रामपंचायत सरपंच गणेश मडावी उपसरपंच अमित बहादूरे यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे