गडचिरोली तालुक्यातील नरभक्षक वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या व्यक्तींच्या नातलगांना आर्थिक मोबदला द्या

गडचिरोली तालुक्यातील नरभक्षक वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या व्यक्तींच्या नातलगांना आर्थिक मोबदला द्या,  शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांची मा. डॉ. किशोर मानकर सर मुख्य वनस्वरंक्षक गडचिरोली वनविभाग गडचिरोली  यांच्याकडे मागणी,

संदीप कांबळे 9421318021

गडचिरोली शहर प्रतिनिधी


सदर मागणीच्या अनुष्णघाने  शासना तर्फे प्रत्येकी 15 लाख पीडितांच्या कुटूंबाला लवकरात लवकर देण्यात येतील व नरभक्षक वाघाचा बंदोबस्त तातडीने करण्या करीता यंत्रणेला कामाला लावण्यात आले आहे तसेच गाव पातळीवर वनविभाग व गावकऱ्या च्या सहकार्याने मचाण /चौकी उभारून गस्तीचे पण काम  करण्यात  येईल अशी ग्वाही डॉ. मानकर सर यांनी दीलेली आहे. तरी सर्व गावकरी लोकांनी सतर्क राहून सहकार्य करावे. आम्ही आपल्या ला नक्कीच सम्पूर्ण मदत  करू पण गांवानी पण सहकार्य व साथ दयावी  अशी आशा सुद्धा व्यक्क्त केली. सदर प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते श्री. विवेक विरदास मून, सौ ग्रीष्मा विवेक मून, श्री. विलास निंबोरकर सर चि. संकल्प विवेक मून 

व वाघ हल्ल्यातील मृत व्यक्तीच्या दोन्ही कुटुंबातील विमलबाई डम्बजी डोंगरे (मृतांची पत्नी ) राकेश डोंगरे(मुलगा ) कुलदीप खोब्रागडे (जावई ), सौ. जिजा खोब्रागडे (मुलगी )तसेच रामचंद्र पुंडलिक निकुरे (मुलगा )व श्री. रमेश भाऊ जेंगटे इंदाळा (जावई )हे प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच या वेळी चुरचुरा व भिकारमोशी लगतच्या गावतील जनता सुद्धा निवेदन घेऊन  वाघाच्या दहशतीचा पाढा वाचण्या करीता बहुसंख्येने  उपस्थित होती.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler