बोडदा येथे विज पडून शेतकरी ठार
मनोज अगळे 9765874115
तालुका प्रतिनिधी
ब्रम्हपूरी तालुक्यातील बोडदा येथिल शेतकरी श्री आनंदराव पा. ठाकरे वय ६0 वर्ष हा शेतकरी विज पडून मृत्यु पावला .
सविस्तर असे की नेहमी प्रमाने आनंदराव पा. ठाकरे हे शेतावर बांधावरील पाणी पाहणी करण्यासाठी शेतावर गेले असता अचानक आलेल्या पावसाने जोरदार विजेचा कळकळाट सुरवात झाली.अगोदरच या परीसरात पावसाने दडी मारली असल्याने भात रोवनीची कामे खोळबंलेली होती.शेतातील पाणी निघुन जाण्याच्या भितिने शेतकऱ्यानां शेतावर जावे लागते. परंतू अचानक आलेल्या पावसाने विजेच्या कळकळाट सूरवात केली. आणी जोरदार विजेचा धक्का लागून शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या पश्चात पत्नी, एक मूलगा व दोन मुली आहेत पुढिल तपास मेंडकी पोलिस करीत आहेत.
