उमरेड क्षेत्रात सामाजिक कार्यकर्त्याची उत्कृष्ट कामगिरी
उमरेड तालुका प्रतिनिधी
मनोज चाचरकर 9970643453
उमरेड, जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना बाधितांची संकेत घाट झालेली असून, डेंगू रोगाचा प्रसार बराच जलद गतीने वाढत आहे. अशातच अनेक सेवाभावी संस्था सामाजिक कार्यकर्ते डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकांना जनजागृतीचे मार्गदर्शन करताना समोर आलेल्या आहेत.
पण उमरेड शहरामध्ये एक नवीन उपक्रम राबवीत शाळकरी मुलांनी आपल्याला मिळणारा पॉकेटमनी, काही पार्ट टाइम जॉब करणारे मुलं सुद्धा या माणुसकीची एक भिंत अशा सेवाभावी समाजसेवी तरुणांनी मोठा पुढाकार घेतलेला आहे. ते आपल्या दैनंदिन जीवनातून काटकसर करून थोडाफार पैसा खिशाला थोडसा आवरत दोन पैसा गरजू लोकांचा, गोरगरिबांच्या उपयोगाला येईल अशाप्रकारे आधार म्हणून माणुसकी या नात्याने रस्त्यावर झोपणारे ज्यांना कुणाला निवारा नाही, अशा व्यक्तींना गरज पडणाऱ्या वस्तू जसे ब्लांकेट्स मच्छरदाण्या जेवण अंगात घालणारे कपडे अशा त्यांच्या उपयोगाच्या वस्तू त्यांना प्रदान करून सेवा स्वरूपात उमरेड शहरात काम करत आहेत, त्यांचे कार्य अतिशय कौतुकास्पद आहेत. यांच्या कार्याला आणखी तरुणांचा मदतीचा हात मिळत आहे, "माणुसकीची भिंत" म्हणून मदतीचा कार्याला नाव देत. गरजू लोकांना किंवा रस्त्यावरील लोकांना कोणताही व्यक्ती उपाशी राहणार नाही याची जबाबदारी स्वीकारत त्यांना रात्रीच्या वेळेस अन्नदान करण्यात येते.
डेंग्यूचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी सोनेझरी व रेल्वे स्टेशन उमरेड मागील झोपडपट्टी या वस्ती या वस्त्यांमध्ये अतिशय गरीब परिस्थितीत वास्तव्य करणारे रोज मजूर या भागांमध्ये राहतात त्या भागातील लोकांना डेंगू विषयी जनजागृती करून त्यांना योग्य योग्य तो मार्गदर्शन करण्यात आले व मच्छरांच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी घरोघरी त्यांच्या दारात जाऊन मार्टिन वितरित करण्यात आल्या असा हा अनोखा उपक्रम राबवीत असताना समाजसेवक गौरव मिश्रा, प्राध्यापिका माधुरी वरभे, मोहन वानखेडे, सोहन उरकुडे, मनोजभाऊ चाचरकर, अमोल सोरते, अजय वानखेडे, निखिल भोयर, सौरभ मानापुरे, चेतन झलके, रोहित सोनवणे,शुभम मोघे एक मदतीचा हात म्हणून सेवाभावी स्वरूपात काम केले.
