चिमूर पोलीस स्टेशनचे नुकतेच नव्याने आलेले पोलीस निरीक्षक मनोज गभने यांचा क्रांती महा डिजिटल असोसिएशन संघटनेतर्फे करण्यात आला सत्कार

चिमूर पोलीस स्टेशनचे नुकतेच नव्याने आलेले पोलीस निरीक्षक मनोज गभने यांचा क्रांती महा डिजिटल असोसिएशन संघटनेतर्फे करण्यात आला सत्कार


चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

प्रवीण वाघे, 7038115037


चिमूर दि.३०/०८/२०२१ चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर शहर म्हणजे क्रांती ची भूमी भारत स्वतंत्र होण्याअगोदर चिमूर या गावामध्ये इंग्रजांसोबत क्रांती घडली बंदुकीच्या गोळ्यांचा वर्षाव झाला अनेक वीर या लढाईमध्ये शहिद झाले.याठिकाणी महात्मा गांधींनी  यांनी १९४२ मध्ये 'चले जाव' चा नारा दिल्यानंतर चिमुरात आंदोलन झाले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या आवाहनानंतर ब्रिटिश सत्तेविरुद्ध आवाज उठवून चिमूर तीन दिवसांसाठी का होईना स्वतंत्र झाले होते. भारतातील हे पहिले स्वातंत्र्य होते. १४ ते १६ ऑगस्टपर्यंतचे हे स्वातंत्र्य नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी बर्लिन रेडिओवरून जगाला कळविले होते.'चले जाव' आंदोलनाचे विदर्भातील प्रेरणास्थान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होते. चिमूर येथील स्वातंत्र्य संग्राम त्यांच्याच प्रेरणेने घडला. स्वातत्र्याच्या मागणीसाठी नागरिकांनी विशाल मोर्चा काढला. या मोर्चाला अटकाव करण्याचा प्रयत्‍न झाल्यानंतर पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. त्यामुळे चिडलेल्या नागरिकांनी विश्रामगृहाला आग लावली. पुन्हा एकदा पोलिसांनी गोळीबार केल्यामुळे अनेक नागरिक शहीद झाले. चिमूरच्या २०० सेनानींवर विशेष न्यायाधीशांच्या न्यायालयांत खटला चालला. २१ क्रांतिकारकांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, तर २६ जणांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली.चिमूरची ती ऑगस्ट क्रांती आजही स्वातंत्र्य लढ्याचा दैदीप्यमान इतिहास सांगते.तसेच राष्ट्रसंतांची भूमी म्हणून ओळख असलेल्या या गावाची संपूर्ण विश्वात ओळख आहे.ताडोबा अभयारण्य हे चिमूर ला लागून असल्याने विदेशातून आलेली पर्यटक सर्वप्रथम चिमूर शहराचे दर्शन घेत असतात.नंतर ताडोबा चे असे हे गाव आहे. सर्वप्रथम भारत स्वतंत्र व्हायच्या अगोदर स्वतंत्र झाले.तसेच या गावाची आगळी - वेगळी मोठी ओळख आहे.याच भूमीतून मोठं - मोठ्या नेत्यांनी राजनैतिक भरारी गाठली आहे.आणि अशा चिमूर पोलीस स्टेशन ला पोलीस निरीक्षक म्हणून मनोज गभनेजी लाभले म्हणून क्रांती महा डिजिटल असोसिएशन संघटनेतर्फे त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष जावेद पठाण , उपाध्यक्ष रोशन जुमडे , सचिव विलास मोहिणकर , प्रविण वाघे, जयंता कामडी , योगेश अगडे यांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler