पुरोगामी पत्रकार संघ चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुका अध्यक्ष पदी प्रविण रामचंद्र चिमुरकर यांची निवड
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
प्रवीण वाघे, 7038115037
भद्रावती : नुकतीच भद्रावती तालुका येथील पुरोगामी पत्रकार संघ भद्रावतीची नविन कार्यकारिणी घोषित करण्यात आली.
भद्रावती शहरातील प्रशीद्ध उद्योजक चिमुरकर टुर्स अँड ट्रॅव्हल्सचे संचालक, ग्राहक पंचायत भद्रावतीचे सहसचिव, एकता २४ न्युजचे सह संपादक आणि संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था भद्रावतीचे शहर अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ता अशी ओळख असणारे प्रविण रामचंद्र चिमुरकर यांची सर्वानुमते पुरोगामी पत्रकार संघ भद्रावती तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.सोबत कार्याध्यक्ष म्हणुन मनोज मोड़क, उपाध्यक्ष पदी शिरीष उगे, सचिव तथा प्रशीद्धी प्रमुख पदी उमेश कांबळे, सहसचिव पदी ज्ञानेश हटवार, संपर्क प्रमुख किशोर ठेमस्कार, सदस्य सदानंद आगबत्तनवार अशी पदाधिका-यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.पुरोगामी पत्रकार संघ भद्रावतीची कार्यकारिणी नरेंद्र सोनारकर (विदर्भ अध्यक्ष), निलेश ठाकरे (पुर्व विदर्भ संघटक), रूपेश निमसरकार (जिल्हा अध्यक्ष चंद्रपुर), जीवनदास गेडाम (जिल्हा महासचिव चंद्रपुर) यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
