आमदार बंटी भांगडीया यांनी रक्षाबंधन निमित्य गरजुंना सायकली तसेच गरजु महीलांना शीलाई मशीन वाटप करत अनेक गावातील विविध समस्या मार्गी लावन्याचे आश्वासन
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
प्रवीण वाघे 7038115037
चिमुर:-चिचाळा (शास्त्री) येथील रक्षाबंधन कार्यक्रम साठी आमदार बंटीभाऊ भांगडीया आले असता लहान लहान विद्यार्थ्यांनी शाळेत जाण्यासाठी सायकल ची आवश्यकता असल्याचे स्वतः अर्ज केला असता तात्काळ आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी सायकल दिल्या.अश्या २४ विद्यार्थ्यांना सायकल दिल्या. तसेच गरजू महिलांनी सुद्धा शिलाई मशीन साठी ५ भगिनींनी अर्ज केला असता ५ शिलाई मशीन भेट दिल्या. भाजपचे तालुका अध्यक्ष राजु पाटील झाडे व रमेशजी कंचर्लावार यांनी आमदार बंटीभाऊ भांगडीया यांचा दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी धावपळ केली. चिचाळा (शास्त्री) येथील २४ सायकल व ५ शिलाई मशीन सरपंच अरविंद राऊत यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आल्या. त्याचप्रमाणे सिरपूर येथे आमदार बंटी भांगडीया यांनी रक्षाबंधन निमित्ताने भाऊ बहिणीच्या दारी उपक्रम अंतर्गत सिरपूर येथे भेट देत बहिणी कडून राखी बांधून घेतली.
यावेळी आमदार बंटी भांगडीया म्हणाले की कोरोना संकटाची माहिती देत भगिनींनी आपली स्वतःची सुरक्षा व काळजी करण्याचे सांगत राखीचा धागा हा हजारो भगिनींचा आशीर्वाद असल्याने पवित्र नाता आहे. कमविलेले प्रेम विश्वास टिकवून ठेवण्यासाठी काम करीत असून कोरोना लसीकरण करण्याचे सांगत विरोधक मात्र कोरोना लसीकरण वर विरोध करत असले तरी त्या कडे लक्ष देऊ नये. शेवटच्या घटकांपर्यत जाऊन जनतेच्या समस्या सोडविणे हे भाजपचे काम आहे.सिरपूर येथील विविध समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन सुद्धा दिले.
संचालन व आभार दिवाकर डहारे व यांनी केले .
सिरपूर येथील महिला मंडळाच्या सरपंच वैशाली निकोडे, सुनीता कुमरे, वर्षा डहारे ,पुष्पा कापगते लता काळसरपे आदी महिलांनी कार्यक्रम यशस्वी केला. याप्रसंगी असंख्य भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते,
