राज्यस्तरीय लसीकरण जनजागृती घोषवाक्य स्पर्धेमध्ये "संकेत कायरकर महाराष्ट्रात प्रथम.
वरोरा तालुका प्रतिनिधी
गणेश उराडे 8928860058
महाराष्ट्रात कोविडची तिसरी लाट आल्याचे बोलले जात आहे. अपेक्षित वाढत असलेल्या संस्था सोबत मृत्युचे प्रमाण वाढत आहे. आपले शेजारी अनपेक्षित या पासुन संक्रमित होत आहे आणि काहिना जिव गमवावा लागतो आहे. केंद्र सरकार असो कि राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन या महामारिला नियंत्रित करायला सर्व शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. आरोग्य विभाग, पोलिस विभाग, सर्व यंत्रणा आणि अनेक सामाजिक संघटना जीव ओतून यासाठी परिश्रम घेत आहेत. मात्र तरीही मोठ्या संख्येने लोक कोणत्याही नियमांचे पालन करीत नसल्याचे दिसुन येते एकिकडे कोविडची तिसरी लाट असताना शासनाला लाँकडाउन करण्याशिवाय पर्याय दिसत नसला तरी त्यामुळे हातावर पोट असलेल्या मजुरांचे हाल होत आहेत. लाँकडाऊन नको म्हणून काही मोर्चे रस्त्यावर दिसुन येत आहे. पण हि महामारी वाढविण्यात काही आपलेच लोक कारणीभूत आहे हे कटु सत्य आहे. आजपर्यंत देशातील जैविक आणि आर्थिक नुकसान करणारी सर्वात मोठी महमारी ठरली आहे. हे लवकर नियंत्रणात आले नाही तर यामुळे होणाऱ्या परिणामांची अपेक्षा करु शकत नाही. आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीला त्याचे परिणाम भोगावे लागतील.
या महमारीला नियंत्रणात आणण्यासाठी ओषधीउपचारासोबत जाणीव जनजागृती हा विषय तेवढाच महत्त्वाचा आहे. "कोविड लसीकरण हा पर्याय असला तरी त्याचे परिणाम दिसायला वेळ लागणार आहेत." हे एकमेव औषध आहे. परंतु अनेक लोकांनमध्ये त्याविषयी गैरसमज संभ्रम असल्याचे दिसुन येते. याविषयी सुद्धा जागृती ची गरज आहे. अशा वेळीप्रसंगी
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ संलग्नित श्री. नरेंद्र तिडके महाविद्यालय रामटेक राष्ट्रीय सेवा योजना विभाग तथा नगर परिषद रामटेक. द्वारा आयोजित "महाराष्ट्र राज्यस्तरीय घेण्यात आलेल्या कोविड लसीकरण जनजागृती घोषवाक्य आँनलाईन स्पर्धेमध्ये" राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातुनसहभागी झाले होते त्यापैकी चंद्रपूर जिल्हातिल आनंद निकेतन महाविद्यालय आनंदवन, वरोरा. येथील एम ए राज्यशास्त्र भाग एक चा विद्यार्थी "श्री. संकेत अरुण कायरकर. वरोरा." यांनी महाराष्ट्रातुन प्रथम क्रमांक मिळविला आहे. सदर विजेत्यांना प्रशस्तिपत्र व रोख रक्कम देण्यात येईल; सदर स्पर्धेचे आयोजक डॉ. संगिता टक्कामोरे. प्राचार्य श्री नरेंद्र तिडके महाविद्यालय रामटेक; मा. दिलीप देशमुख. नगराध्यक्ष नगर परिषद रामटेक; मा. अमोल मानकर. उपाध्यक्ष नगर परिषद रामटेक. स्पर्धेचे संयोजक कु. अर्चना वंजारी. मुख्य कार्यपाल अधिकारी; डॉ. श्रीकांत भोवते. राज्यशास्त्र विभाग प्रमुख व समन्वय IQAC विभाग. कार्यक्रम समन्वयक व संपर्क प्रमुख अमरीश ठाकरे सहा. प्रा. वानिज्य विभाग. व समन्वयक विद्यार्थी विकास महामंडळ; गजानन रेवतकर ग्रंथपाल व समन्वयक या सर्वांचे मार्गदर्शक लाभले. तसेच आनंद निकेतन महाविद्यालय आनंदवन येथील राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी मा. डॉ रंजना लाड., डॉ. नरेंद्र पाटील यांनी कौतुक केले.
