रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या अतुट नात्याचा सण नगराध्यक्ष सौ. योगिताताई पिपरे

रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या अतुट नात्याचा सण नगराध्यक्ष सौ. योगिताताई पिपरे


भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या,वतीने रक्षाबंधन कार्यक्रम,,

संदीप कांबळे 9421318021

गडचिरोली शहर प्रतिनिधी




       बहीण आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी भावाच्या हातावर राखी बांधते तसेच आयुष्यभर आपलं रक्षण करावं ,असं वचनही बहीण भावाकडून घेत असते. म्हणुनच रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या अतुट नात्याचा सण असल्याचे प्रतिपादन आज  भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने स्थानिक पोलिस स्टेशन येथे रक्षाबंधन कार्यक्रम घेण्यात आला यावेळी नगराध्यक्ष सौ. योगिताताई पिपरे यांनी केले,

         निवासी अपंग विद्यालय लांजेडा येथील विध्यार्थी व शिक्षकांना राखी बांधण्यात आले. तर वृद्धाश्रम येथील वास्तव्यास असलेल्या वृद्ध नागरिकांना राखी बांधून आस्थेने विचारणा करण्यात आली.पोलीस निरीक्षक प्रमोद बाणबले,सहा.पोलीस निरीक्षक शरद मेश्राम, सहा. फौजदार प्रभाकर भेंडाळे, यमाजी कावळे, पोलीस हवालदार खेमराज नवघडे, प्रमोद वाळके,रमेश उसेंडी,राजेश्वर खोब्रागडे व इतर पोलीस अधिकारी व अमलदार यांना राखी बांधन्यात आले व महिलांचे रक्षण करण्याचे वचनही त्यांच्याकडून घेण्यात आले.

    यावेळी महिला आघाडी जिल्हाध्यक्ष योगिता भांडेकर,जिल्हा महामंत्री वर्षा शेडमाके,शहर अध्यक्ष कविता उरकुडे,जेष्ठ कार्यकर्त्या चौधरी,नगरसेविका वैष्णवी नैताम,शहर उपाध्यक्ष कोमल बारसागडे,पुनम हेमके,रश्मी बाणमारे,ज्योती बागळे,देवाजी लाटकर निवासी अपंग विद्यालय येथील मुख्याध्यापक एस. जी. हर्षे,सहा.. शिक्षक एस. पी. जोशी,बी. आर. दोनाडकर,एस. के. चापे,चापले,आडेपवार व शाळेतील विध्यार्थी उपस्थित होते,

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler