12 वर्षीय बालिकेचा विनयभंग, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

12 वर्षीय बालिकेचा विनयभंग, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

गोंडपिपरी तालुक्यातील घटना 

सतीश नेवारे 8458432185

गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी



गोंडपिपरी :- घरात एकटी असलेल्या बारा वर्षीय बालिकेचा विनयभंग करणाऱ्या चाळीस वर्षीय विवाहित पुरुषाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हि घटना गोंडपिपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा येथे घडली. आरोपी विरोधात पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील विठ्ठलवाडा येथील सुधाकर अवथरे वय वर्ष (40) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार ला दुपारी 1 वाजताच्या सुमारास सदर बालिकेचा विनयभंग करत अत्याचार करण्याचा प्रयत्न अवतरे यांनी केला, व्यक्तिगत कामानिमित्त पीडीतिचे आई वडील बाहेर गावी गेले होते, पीडीतिला घरात एकटे बघून आरोपीने विनयभंग केला,घडलेला प्रकार पीडितेने कुटुंबीयांना सांगितला,

पीडितेच्या वडिलांची गोंडपिपरी पोलिस स्टेशन गाठले व आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली, गोंडपिपरी चे ठाणेदार जीवन राजगुरू साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गोंडपिपरी ठाण्याचे P.S.I. पटले साहेब यांनी बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. दरम्यान पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. वैद्यकीय तपासणीनंतर पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली. मुल येतील पास्को पथकाचे प्रमुख रामटेके मॅडम याप्रकरणी तपास करीत आहे,

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler