पेठगाव येथील फिरते आरोग्य पथकास सावली तालुका काँग्रेस ची भेट.

 पेठगाव येथील फिरते आरोग्य पथकास सावली तालुका काँग्रेस ची भेट.


उमेश गोलेपल्लीवार

तालुका प्रतिनिधी सावली



   सावली - माननीय नामदार विजय भाऊ वडेट्टीवार यांच्या विशेष प्रयत्नातून ब्रम्हपुरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रातील सावली तालुक्यात फिरते आरोग्य पथक दाखल झाले असून सावली तालुक्यातील दुर्गम भागातील सदर आरोग्य पथकाच्या माध्यमातून जनतेची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे

    आज सावली तालुक्यातील पेठगाव येथे सदर आरोग्य पथक दाखल झाले असता पेठगाव येथे सावली तालुका काँग्रेस च्या वतीने पाहणी करण्यात आली

    विशेष म्हणजे या पथकाच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी, मोफत बी पी तपासणी, मोफत मधुमेह तपासणी, मोफत औषध उपचार, करण्यात येणार आहे

    दरम्यान आज पेठगाव येथे 59 लोकांनी आरोग्य तपासणी केली त्यात मधुमेह 43,अंगदुखी 30 व कफ 1 असे रुग्ण दिसून आले केरोडा येथे 50 लोकांनी आरोग्य तपासणी केली. कोंडेखल येथे 92 लोकांनी आरोग्य तपासणी केली. सदर रुग्णांना योग्य तो औषध उपचार करण्यात आला

    सदर मोफत आरोग्य पथकाला जनतेचा उत्तम प्रतिसाद मिडत असून जास्तीक जास्त लोकांनी सदर मोफत आरोग्य पथकाचा लाभ घ्यावा असे आवाहन सावली तालुका काँग्रेस कमिटी, सावली तालुका महिला काँग्रेस कमिटी, सावली तालुका युवक काँग्रेस कमिटी यांनी केले आहे

   दरम्यान पेठगाव येथे आरोग्य पथकास भेट देतेवेडी तालुका काँग्रेस चे अध्यक्ष नितीन गोहणे, संजय गांधी निराधार कमिटीचे सदस्य अनिल पाटील मशाखेतरी, हिरापूरचे उपसरपंच शरद कंनाके, मोखाल्याचे उपसरपंच संदीप जुनघरे,पेठगाव येथील कॉंग्रेस चे कार्यकर्ते रामचंद्र पाटील दहेलकर, डॉ. मयुरी धांडे, डॉ. शिवानी नागपुरे, पपिता शेंडे उपस्थित होत्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler