ध्येय प्रेरित पुरुषांनी केली बचत गटाची स्थापना,प्रहार चालक मालक पुरुष बचत गट गडचिरोली
स्थापनेला 2 वर्ष पूर्ण,
संदीप कांबळे
गडचिरोली शहर प्रतिनिधी
9421318021
बचत गट ही काळाची गरज आहे,
बचत करणे म्हणजेच आर्थिक उन्नती व्हावी व बचतीची सवय लागावी या हेतूने मागील दोन वर्षांपूर्वी 20 चालक मालकांनी प्रहार पुरुष बचत गटाची स्थापना केली,बचत गटाची स्थापना म्हणजे केवळ पैसा गोळा करणे हा मुख्य उद्देश नसून,सामुदायिक भावना वाढीस लागावी,संघटन कौशल्य निर्माण व्हावे हा उद्देश समोर ठेऊन मागील दोन वर्षांपासून चालक मालकांनी बचत सुरू केली आहे,
थोड्याफार पैशासाठी लोकांसमोर हात पसरावे लागते,बँकांचे कर्ज मिळत नाही यातून सुटका करून घेण्यासाठी बचत गट हे प्रभावी माध्यम आहे यामुळे या माध्यमातून आर्थिक प्रगती साधता येते,या बाबींचा विचार करूनच बचत गटाची स्थापना करण्यात आली ,दर महिन्याला या बचत गटाची मासिक सभा होते,व सर्वांसमोर हिशोब लिहिला जातो ही बाब विशेष,,
मासिक सभेला श्री संदीप कांबळे अध्यक्ष,श्री स्वप्नील मने सचिव म्हणून बचत गटाचा कारभार पाहत आहेत,तर,श्री चेतन भजभूजे, श्री गुणाजी सलोटकर,श्री किशोर नंदगीरवार,श्री दिपक खोब्रागडे, चंदू बोकडे, भैयाजी आत्राम, ठाकूर बन्सोड,गुरुदेव नैताम,साईनाथ चलाख,प्रकाश सुत्रपवार,आशिष नैताम,संदीप बुरांडे,सुनील तामशेठवार, राहील खतीब,देवराव मेश्राम आदी सभासद आवर्जून सभेला हजर होते,,
