दिनांक 25 सप्टेंबर 2021 रोज शनिवारला जनसंपर्क कार्यालय काँग्रेस कमिटी चिमूर येथे माननीय. सौ चित्राताई डांगे जिल्हाध्यक्ष, महिला काँग्रेस कमिटी चंद्रपूर यांचे अध्यक्षतेखाली सौ. सविताताई चौधरी अध्यक्ष, महिला काँग्रेस कमिटी चिमूर यांचे नेतृत्वात महिला काँग्रेस चिमूरची येथे संपन्न झाली.

दिनांक 25 सप्टेंबर 2021 रोज शनिवारला जनसंपर्क कार्यालय काँग्रेस कमिटी चिमूर येथे माननीय. सौ चित्राताई डांगे जिल्हाध्यक्ष, महिला काँग्रेस कमिटी चंद्रपूर यांचे अध्यक्षतेखाली सौ. सविताताई चौधरी अध्यक्ष, महिला काँग्रेस कमिटी चिमूर यांचे नेतृत्वात महिला काँग्रेस चिमूरची येथे संपन्न झाली.

चिमूर तालुका ग्रामीण प्रतिनीधी

 सचिन वाघे मो.9673757006



 सभेचे प्रस्थाविक सौ. सविताई  चौधरी यांनी करतांना तालुक्यात काय परिस्थिती आहे हे स्पष्ट केले. तसेच तळागळात जाऊन पक्ष संगठण कशाप्रकारे निर्माण करीत आहोत त्याबद्दल माहिती दिली.

अध्यक्षीय भाषणात सौ. चित्राताई डांगे यांनी सांगितले कीं पक्षाला एकत्रितपणे लढण्याची आज आपल्याला गरज आहे व त्यामुळे सर्वांनी संगठण मोठ्या प्रमाणात उभारून चिमूर तालुक्यात काँग्रेस कार्यकर्ता महिलांची संख्या वाढवावी. तसेच कोणीही गटबाजी न करता सर्वांनी मिळून मिसळून पक्षाचे कार्य करावे असे ठणकावून अध्यक्ष यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले.

   सभेचे संचालन सौ. प्रीती दिडमुठे उपसरपंच ग्रामपंचायत साठगाव तथा समन्वयक शंकरपूर - डोमा सर्कल महिला कमिटी चिमूर यांनी केले तर कु. नाजेमा पठाण यांनी उपस्थित असणाऱ्या सर्वांचे आभार मानले व कार्यक्रम संपला असे जाहीर केले.

   यावेळी सौ. सविताताई चौधरी अध्यक्ष महिला काँग्रेस कमिटी चिमूर, सौ. गीतांजलीताई थुटे अध्यक्ष शहर काँग्रेस कमिटी चिमूर, सौ. लताताई अगडे माजी. ता. अध्यक्ष महिला काँग्रेस चिमूर,  लताताई पिसे सभापती, सौ.कलमताई राऊत संचालिका बाजार समिती चिमूर, वनिता मगरे माजी. युवती अध्यक्ष चिमूर, ममताताई भीमटे, चंदाताई कारेकर माजी. सरपंच आमडी.बे, सौ. रोशनीताई बारसागडे सरपंच बोडधा, सौ. रंजनाताई उईके, सौ.बेबेताई डहारे, सौ. वंदनाताई सहारे, सौ. प्रिती दिडमुठे उपसरपंच साठगाव तथा समन्वयक शंकरपूर-डोमा सर्कल महिला अध्यक्ष, कु. नाजमा पठाण अध्यक्ष अल्पसंख्याक महिला काँग्रेस चिमूर, सौ. सीमाताई गाडगे आदी महिला कार्यकर्त्या आढावा सभेला बहुसंख्येने उपस्थित होत्या.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler