ब्रम्हपुरी येथे महिला काँग्रेसची आढावा बैठक संपन्न
ब्रम्हपूरी तालुका प्रतिनिधि.
मनोज अगळे
9765874115
२६/९/२०२१
ब्रम्हपुरी येथील स्थानिक शासकीय विश्रामगृहात ब्रम्हपुरी तालुका महिला काँग्रेस कमेटीची आढावा बैठक चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेसच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष चित्राताई डांगे यांच्या अध्यक्षतेखाली व ब्रम्हपुरी तालुका महिला काँग्रेस कमेटीच्या अध्यक्षा मंगलाताई लोणबले, ब्रम्हपुरी नगरपरीषदेच्या नगराध्यक्षा सौ. रीताताई उराडे, माजी नगराध्यक्षा वनीताताई ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलतांना जिल्हा महिला काँग्रेस कमेटीच्या अध्यक्षा चित्राताई डांगे म्हणाल्या की, काँग्रेस पक्षाचे विचार सर्वस्तरावरील नागरीकांपर्यत पोहचविण्यासाठी महिला काँग्रेसच्या सर्व महिला कार्यकर्त्यांनी सदैव प्रयत्नशील राहीले पाहिजे.
केंद्रात सत्तारूढ असलेल्या भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशात महागाई वाढलेली असून सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. इंधन गँस दरवाढीमुळे गृहिणींचे आर्थिक बजेट बिघडले आहे असे यावेळी सांगितले.
सोबतच आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला भरघोस विजय मिळावा यासाठीचा आढावा सुध्दा यावेळी घेण्यात आला.
यावेळी झालेल्या बैठकीचे सुत्रसंचालन शहर महिला काँग्रेस कमेटीच्या अध्यक्षा योगीताताई आमले यांनी केले. तर उपस्थितांचे आभार जि.प.सदस्या स्मिताताई पारधी यांनी मानले.
कार्यक्रमाला ब्रम्हपुरी नगरपरीषदेच्या नगरसेविका सुनिताताई तिडके, नगरसेविका सरीताताई पारधी, नगरसेविका निलीमाताई सावरकर, नगरसेविका लताताई ठाकुर, भावना ईरपाते माजी सदस्या जिल्हा परिषद चंद्रपूर, मंगला टिकले, स्नेहा मोटघरे, नयना गुरनुले, मंगला ईरपाते, पुष्पा गभने, विद्या चौधरी, सरिता पारधी,सुरेखा नागतोडे,बेबी माटे,गिता मेश्राम, तनुजा राऊत,दिपा कावळे,प्रतिभा कोडापे,सुधा राऊत सुवर्णा तुपट,संगिता वाकडे,मेघा पिंपळकर, अश्विनी फुलवले , पुनम कसारे, सोनाली सुर्यवंशी, धनश्री सिडाम,आदी सह बहुसंख्य महिला पदाधिकारी उपस्थित होते
