वृक्षारोपण करून केले श्री गणेशाची स्थापना

वृक्षारोपण करून केले श्री गणेशाची स्थापना

उसेगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक गणेश मंडळाचे अभिनव उपक्रम

चिमूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज गभने यांच्या हस्ते वृक्षारोपण व गणेशाची स्थापना 


चिमुर तालुका ग्रामीण प्रतिनिधी

सचिन वाघे मो.9673757006

नेरी येथून जवळ असलेल्या उसेगाव येथील उत्साही नवतरुणाचा भरणा असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने मस्कऱ्या गणपतीची स्थापना वृक्षरोपण करून केली या वृक्षारोपण ला चिमूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक मनोज गभने आणि सहकारी उपस्थित होते 

          दर वर्षी प्रमाणे याही वर्षी उसेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक गणेश मंडळाने गणेशमूर्तीची स्थापना अभिनव उपक्रम राबवित करण्याचे ठरविले यासाठी त्यांनी कोरोनाच्या आणि शासनाच्या नियमाची पायमल्ली न होता वाजत गाजत मिरवणूक न काढता वृक्ष खरेदी करून वृक्षारोपण करून गणेशाची स्थापना करण्याचे ठरविले आणि चिमूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार मनोज गभने याना बोलविण्यात आले तेव्हा गणेशोत्सव चा आढावा घेण्यासाठी प्रत्येक गावात भेटी देत असताना पोलिस निरीक्षक उसेगाव येथे आले असता त्यांना वृक्ष भेट देऊन त्यांच्या हस्ते  वृक्षारोपण करण्यात आले यानंतर  गणेश मूर्ती ची स्थापना पोलीस निरीक्षक मनोज गभने सहाययक पोलीस निरीक्षक मंगेश मोहोड कैलास आलाम मोहूर्ले मेजर  त्यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी उसेगाव येथील सरपंच सौ प्रियंका पाटील उपसरपंच निखिल चाफले  मंडळाचे अध्यक्ष अंकित चाफले उपाध्यक्ष लेतेश सांदेकर अक्षय चाफले आस्तिक चांभारे गणेश कामडी सूरज दोडके रामप्रसाद दोडके मंडळाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी व गावकरी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler