कृषी दूताने बांधावर जाऊन इ पीक पाहणी आणि नोंदणीसाठी शेतकऱ्यांना केली मदत
चिमुर तलुका प्रतिनिधी
सचिन वाघे मो.9673757006
ई-पीक पाहणी ॲपव्दारे नोंदणी बधंनकारक केली असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या संदर्भात विविध समस्यांना समोर जावे लागत आहे. ही बाब लक्षात घेता कृषी महाविद्यालय कोघांरा येथे अंतिम वर्षाला शिक्षण घेणारा हितेश प्रल्हाद गायकवाड याने उसेगाव येथील अनेक शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष भेट देऊन ई-पीक पाहण्याचे प्रात्याक्षिक करून दाखवते तसेच पिकपेऱ्याची नोंदणी करून दिली.
शेतकऱ्यांनी हा ॲप कसा हाताळावा आणि त्यात माहिती कशी भरावी ई-पीक पाहणीचे भविष्यात फायदे काय याबद्ल सविस्तर मार्गदर्शन केले. एवढेच नाही तर ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम च्या माध्यमातुन याआधी गावात अनेक प्रात्याक्षिके हितेश ने राबविले आहे. मातीचे नमूने कसे तयार करायचे, ॲझोला उत्पादन, बीज प्रक्रिया यावेळी कृषीमित्र हितेश गायकवाड तसेच शेतकरी राहूल नन्नावरे, हिमांशु दांडेकर, देवराव चांभारे, शेषाराव लाडस्कर,शिवचरण गायकवाड व गावातील प्रतिष्टीत नागरिक उपस्थीत होते.