तुम्ही गावात दारु पिऊ नका आनी विक्री पन करु नका पिल्यास किंवा विक्री केल्यास ताबडतोब कारवाही

तुम्ही गावात दारु पिऊ नका आनी विक्री पन करु नका पिल्यास किंवा विक्री केल्यास ताबडतोब कारवाही


चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

प्रवीण वाघे




ग्रा प चा ठराव घेऊन केली दारू बंदी महिला समिती गठीत 
चिमूर तालुक्यातील नेरीवरून जवळ असलेल्या महादवाडी या गावात  मागील अनेक वर्षांपासून दारू चा महापूर असून गावातील प्रत्येक चौकात व ग्रामपंचायत च्या समोर अवैध दारू मिळत आहे  तसेच अवैध दारू विक्रेत्याची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे त्यामुळे तळीरामांची संख्या वाढत चालली आहे दारू पिऊन चौका चौकात धिंगाने सुरू असून महिलांना उद्देशून वाईट बोलण्याचे प्रकार वाढले आहे  टोमणे मारण्याचे   प्रकार वाढला आहे मद्य पिऊन मद्यपी गावात पडून असल्याचे चित्र दिसत आहे त्यामुळे गावातील महिला मंडळींनी स्वतः पुढाकार घेत ग्रा प निवेदन सादर करीत महिला दारू बंदी समिती गठीत करण्याची मागणी केली त्या अनुशंगाने 24 सप्टेंबर ला महिला सभा आयोजित करून दारू बंदी साठी एकमताने दारूबंदी महिला समिती गठीत करण्यात आली 

               महादवाडी येथे मागील काही दिवसांपूर्वी सरपंच भोजराज कामडी यांनी गावातील दारूबंदी साठी प्रशासनाला निवेदन दिले होते गावाच्या विकासासाठी गावात दारू बंद पाहिजे तेव्हाच विकास होईल असे ठणकावून सांगितले होते परंतु त्यांना दाद मिळणी नाही तेव्हा महिलांनी सुद्धा समिती गठीत करीत पुढाकार घेतला कारण गावात तसेच घराघरात भांडण तंटे वाढले असून कौटुंबिक कलह वाढत चालले आहे या सर्व प्रकारामुळे गावातील महिलांनी व युवकांनी पुढाकार घेऊन गावातील अवैध दारू बंद झाली पाहिजे तसेच अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई झाली पाहिजे यासाठी महिला समिती गठीत करण्यात आली  

          महादवाडी या गावात मागील अनेक वर्षापासून अवैध दारू विक्री सुरू आहे  महाविकास आघाडी सरकारने चंद्रपूर जिल्हातील दारूबंदी उठविली दारूची दुकाने सुरू होऊन सर्रास दारू मिळत आहे त्यामुळे ग्रामीण भागात अवैध दारू विकणाऱ्या ची संख्या वाढत आहे  येथे अनेक दारू विक्रेते तयार झाले असून दारूचा महापूर सुरू आहे गावातील तळीराम मस्त दारूवर पैसे उडवीत कुटुंबाचा नाश करीत आहेत दारूच्या व्यसनासाठी घरातील अन्न धान्य विकून हौस पूर्ण करीत आहेत घराघरात भांडणे सुरू झाली आहेत चौकात झगडे होऊ लागले आहेत तरुण युवक व्यसनाधीन होत आहेत गावाच्या विकास कार्याला हे तळीराम अडथळा निर्माण करीत असून ग्रा प प्रशासनाला भडिमार शिव्या देत असतात कुटलेली काम सुरळीत न होऊ देता काम बंद करण्याचा प्रयत्न करीत असतात त्यामुळे आता 24 सप्टेंबर ला दारु बंदी महिला समिती गठीत करण्यात येऊन जो कोणी सार्वजनिक ठिकाणी दारू पिनार किंवा विकणार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे गावात किंवा परिसरात आता कुणालाही अवैध दारू  विकता येणार नाही तसेच दारू पिणाऱ्याला आता कुणालाही शिविगाळ करता येनार नाही असे निदर्शनास आल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल असे ठराव घेण्यात आला  ही महिला सभा ग्रा प च्या आवारात घेण्यात आली या सभेत सौ प्रेमीला जालेंद्र लोडगे अध्यक्ष तर सौ  कांता गणेश बावणे उपाध्यक्ष सौ आशा अशोक कोरांगे उपाध्यक्ष   सौ नंदा भारत भागडे सचिव यांची निवड करण्यात आली  गावातील सर्व महिला पुरुष   युवक वर्ग उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler