शेतकरी भारत बंद च्या समरणार्थ आज टेमुर्ड्यात प्रहार च्या चक्काजाम आंदोलनास उस्फुर्त प्रतिसाद
वरोरा तालुका प्रमुख
गणेश उराडे
8928860058
वरोरा:-
केंद्र सरकारने लावलेल्या तीन कृषी कायदे रद्द करा या साठी गेली आठ महिने शेतकरी बांधव दिल्ली च्या सीमा बंद करून आंदोलन करत आहेत. आठ महिने होऊनही तीन कृषी कायदे रद्द व्हायला हवे होते पण ते रद्द झाले नाही. आज त्या साठी सर्व पक्षीय शेतकरी संघटना कडून संपूर्ण भारत बंद ची घोषणा केली होती.
टेमुर्ड्यात प्रहार च्या वतीने शेतकरी कायदे रद्द करावे सोयाबीन निघायच्या आधी मिळालेला बारा हजार रुपये प्रतिक्विंटल भाव आज अचानक तीन हजार रुपयांवर आला तो भाव दहा हजार रुपये मिळावा या साठी प्रहार चे किशोर डुकरे यांच्या नेतृत्वात टेमुर्ड्यात चक्का जाम आंदोलन करण्यात आले जवळपास अर्धातास वाहतून अडविण्यात आली या आंदोलनाला प्रहार चे किशोर डुकरे, अमित बहादूरे, पिंटू वासेकर, गणेश उराडे, संदीप झाडे, अक्षय बोंदगूलवार, राकेश भूतकर, गजानन वाढई, गणेश मडावी गोलू झिले निखिल विरुटकर, विशाल देठे, तसेच पाठिंबा मनुन इतर पक्षाचे कार्यकर्ते राजू आसुटकर विठ्ठल जोगी, सुरेंद्र देठे, अरविंद बोडणे, अमित रोडे, अरुण डोये, आकाश धवणे, दिनेश बदकी, उमेश टोंगे, अमोल वासेकर, नीलकंठ आमटे, शालीक डुकरे तसेच तालुक्यातील शेतकरी बांधव मोठया संख्येने उपस्तीत होते
