मोदी सरकार च्या शेतकरी विरोधी,जन विरोधी धोरणाविरुद्ध भारत बंद पाठिंबा,,
धरणे व रस्ता रोको करताना विविध राजकीय पक्षांचा समावेश,,,
गडचिरोली प्रतिनिधी
संदीप कांबळे
9421318021
गडचिरोली इंदिरा गांधी चौक येथे आज केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कडक कायद्याच्या विरोधात विविध राजकीय पक्ष यांनी एकत्र येऊन खूप मोट्या संख्येने गर्दी केली होती,
गडचिरोली ते सिरोंचा ,कोरची या भागातील या बंद ला हजर होते,
याप्रसंगी तीन कृषी कायदे रद्द करा,शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दिड पट हमी भावाचा केंद्रीय कायदा करावा ,पेट्रोल,डिझेल, व घरघुती गॅसच्या किमती कमी करा,वीज दुरुस्ती विधेयक रद्द करा या प्रमुख मागण्यासाठी दिल्ली येथे मागील वर्ष भरापासून आंदोलन करत आहे त्याच आंदोलनाला पाठिंबा म्हणून गडचिरोली येथे आंदोलन करण्यात आले,याप्रसंगी आम आदमी पार्टी चे संयोजक श्री बाळकृष्ण सावसाकळे सर,भारतीय कम्युनिस्ट पार्टी चे देवरा चौके, काँग्रेस चे श्री सतीश विधाते,राष्ट्रीय काँग्रेस चे रवी भाऊ वासेकर, किसान आघाडी चे श्री वामनराव सवसाकळे,अखिल भारतीय रिपब्लिक पार्टी बहुजन रिपब्लिक सोशलिस्ट पार्टी चे श्री,रोहिदास राऊत,समाजवादी पार्टी,अखिल भारतीय किसान सभा हे इतर पक्षाचे कार्यकर्ते प्रामुख्याने या बंद ला हजर होते,

