नेरी पोलिस चौकिला सहायक पोलिस निरीक्षक मंगेश मोहोड़ रुजू
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी:-प्रवीण वाघे,
नेरी सरपंच रेखाताई पिसे ग्रामपंचायत प्रशासनाच्या मागणीला यश
ग्रापंचायतच्या महिला पदाधिकारी व प्रतिष्ठीत महिला आणि नागरिक यांच्या हस्ते स्वागत व अभिनंदन
चिमूर पोलिस स्टेशन अन्तर्गत येणाऱ्या नेरी पोलिस चौकिला सहाय्यक पोलिस निरीक्षक मंगेश मोहोड़ रुजू झाले असून नेरी ग्रामपंचायत च्या आणि नेरी येथील प्रतिष्ठित महिलांच्या च्या वतीने रुजू झाल्याबद्दल स्वागत व अभिनंदन करन्यात आले आहे,
चिमूर तालुक्यात्यातील नेरी पोलिस चौकिला 30 ते 32 गावे समाविष्ट असून नेरी पोलिस चौकिला पूर्ण वेळ पोलिस कर्मचारी द्या या मागणीचे निवेदनपर चर्चा मागील काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायतीच्या आवारात मस्कऱ्या गणपतीच्या आढावा बैठकीत पोलिस निरीक्षक मनोज गभने यांच्याशी ग्रामपंचायतीच्या प्रशासनाच्या आणि प्रतिष्ठित नागरिकांच्या वतीने चर्चा करण्यात आले होते,आणि एक उपनिरीक्षक व चार कर्मचाऱ्यांची मागणी केली होती या मागणीची दखल पोलिस निरीक्षण गभने यानी घेतली व नेरी पोलिस चौकिला सहायक पोलिस निरीक्षण मंगेश मोहोड़ 4 पोलिस कर्मचारासाहित रुजू झाले, पोलिस चौकिला पूर्ण वेळ कर्मचारी ठेवन्याचा प्रयत्न करणार तसेच येणाऱ्या सर्व समस्या सोडविण्यासाठी अथक प्रयत्न करून समस्या मार्गी लावणार असे ए पी आय मंगेश मोहोड यांनी बोलताना सांगितले
यावेळी ए पी आय मंगेश मोहोड साहेबांचा रुजू झाल्याबद्दल स्वागत व अभिनंदन करण्यासाठी भाजपा महिला आघाडी च्या अध्यक्षा सौ.माया नन्नावरे,नेरी ग्राम पंचायत सरपंच सौ.रेखा पिसे,ग्राम पंचायत सदस्य पिंटु खाटिक,निखिल पिसे,संगीता कामडी, संगीता वैरागड़े,उषा गराटे, गंगाबाई कामडी उपस्थित होत्या तसेच गावातील नागरिक उपस्थित होते
