सिदखेड राजा शहरातील मंगला गणेश शिंगणे या पाण्या मध्ये वाहून गेल्या
सचिन भुतेकर - 7768835065
सिंदखेड राजा शहर प्रतिनिधी
सिंदखेड राजा शहरातील भालदारा शिवार मधील कट्टा मध्ये जिजामाता नगरीतील तीन महिला भाजीपाला जमा करून आनण्यासाठी गेले असता पाऊस प्रचंड पडत असल्यामुळे पावसाचा अंदाज आला नाही .घरी निघताना कट्ट्या मधून बाहेर पडत असताना पाण्यामध्ये वाहून गेल्या .त्यातील दोन महिला संगिता संतोष शिंगणे वनिता शिंगणे या दोघी सख्या बहिणी झाडाला धरून बाहेर पडल्या व त्यांची काकू मंगला गणेश शिंगणे या वाहून गेले आहेत. स्थानिक रहिवाशांना माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचले पोलीस कर्मचारी व महसूल यांची टीम पण उपस्थित होती.सदर महिला मंगला गणेश शिंगणे अद्यापी बेपत्ता आहे तिचा शोध घेतला असता ती सापडली नाही .सिदखेडराजा तहसीलदार सुनील सावंत ठाणेदार केशव वाघ नगरसेवक गौतम खरात दीपक भालेराव यांनी कुटुंबीयांची भेट घेऊन उदय लवकरच शोध मोहीम सुरू करणार असल्याचे सांगितले
