नेरी प्राथमिक आरोग्य केंद्र रामभरोसे
पिण्याच्या पाण्यात जंतु, तर रात्रभर डाॅक्टरच राहत नाही अश्या अनेक समस्यांच्या विळख्यात,
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
प्रवीण वाघे मो, 7038115037
चिमुर तालुक्यातील नेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे मोठे केंद्र असून हे केंद्र समस्या चे माहेर घर बनले आहे या केंद्रात पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी राहतच नाही पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या आहेत, पाण्यात जंतु पडल्याचे दिसत येत असून अनेक दिवसांपासून पाण्याची टाकीची स्वच्छता केली नाही, त्यामुळे गेल्या कित्येक दिवसापासून रुग्नांना व रुग्णांच्या नातेवाईकांना १ थेंब सुद्धा पिण्याचे पाणी मिळत नाही, आनी पाणी प्यायला मिळालेच तर ते जंतु असलेले रोगराईला जाहीर आमंत्रण असलेले, आरोग्य केंद्राच्या परिसरात अस्वच्छता दिसून येत असून जिकडे तिकडे कचरा घाण दिसत आहे उपचारासाठी जाताना पावती काढणारा कर्मचारी टेबल वर हजर राहत नाही रात्रीला फक्त दोन कर्मचारी हजर राहतात वैद्यकीय अधिकारी हजर राहत नाही तसेच कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या आहे औषधी चा साठा सुद्धा उपलब्ध राहत नाही, अबुलन्स उपलब्ध राहत नाही राहिली तर त्या गाड़ी चा चालक रूग्णांना शहाणपणा सांगतो व असभ्य भाषेत बोलतो अश्या अनेक समस्यांनी या आरोग्य केंद्राला ग्रासले असून समस्यांच्या विळख्यात सापडला आहे असा हा नेरी प्राथमिक आरोग्य केंद्राचा रामभरोसे कारभार सुरू आहे याकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असून लोकप्रतिनिधी चे सुद्धा लक्ष नाही त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे
नेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे तालुक्यातील मोठे केंद्र असून या आरोग्य केंद्राला सहा उपकेंद्र जोडले असून अंदाजे तीस ते चाळीस खेडी गावे जोडली असून याच आरोग्य केंद्राच्या भरोश्यावर कामकाज सुरू आहे वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांना खासगी किंवा इतरत्र उपचारासाठी जावे लागत आहे आकस्मिक सेवा नसल्यामुळे रुग्णांना आपले जीव गमवण्याचा धोका निर्माण झाला आहे गोर गरीब सामान्य रुग्णाच्या सेवेकरिता प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे मात्र येथे अनेक समस्या असल्याने रुग्णांना नाहक त्रास सहन करावे लागत आहे आपले उपचार करण्याकरिता बाहेर जावे लागत आहे त्यामुळेआर्थिक भुदंड त्यांच्यावर बसत आहे रुग्णांना या केंद्रात पुरविल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या सुविधा कडे दुर्लक्ष होत आहे आरोग्य केंद्र हे रुग्णाचे आरोग्य सुदृढ करण्यासाठी बनविले आहे परंतु इथे स्वच्छता दिसत नाही त्यामुळे बरेच रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात जाताना दिसत आहेत उपचारासाठी येणारे रुग्ण हे सर्व बघून उपचार न करताच बाहेर जात आहेत सध्या पावसाळा असून साथीच्या रोगांची लक्षणे दिसून येत आहेत व रुग्ण पण आहेत परंतु या केंद्रात सोयी सुविधा च्या अभावामुळे रुग्णानी याकडे पाठ फिरवली आहे आणि या सर्व बाबीकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असून लोकप्रतिनिधी चे सुद्धा लक्ष नाही तेव्हा संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन या आरोग्य केंद्राला समस्या च्या विळख्यातून बाहेर काढावे तसेच योग्य ती चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी जनता करीत आहे

