चिमुर तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र येथे रक्त तपासणी चाचणी ऊपलब्ध करुन द्या.

चिमुर तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र येथे रक्त तपासणी चाचणी ऊपलब्ध करुन द्या. 

सभापती लता पीसे यांचे तालुका वैद्यकीय अधिकारी चिमुर यांना निवेदन, 


चंद्रपूर प्रतिनिधी

प्रवीण वाघे


चिमुर:-गेल्या दोन वर्षापासून देशभरात आजारांनी थैमान घातल आहे. सध्या चिमुर तालुक्यात मोठ्या प्रमाणात डेंग्यू मलेरिया, चिकन गुनीया, यासारख्या अनेक आजारांनी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पसरत आहेत. या आजाराने ग्रस्त रुग्णांना सर्व प्रथम  डाॅक्टरांच्या सल्लेनुसार रक्त तपासणी करूनच पुढील औषधोपचार करावा लागतो.या करीता चिमुर तालुक्यामध्ये पुर्वी प्राथमिक आरोग्य केंद्र तथा उपकेंद्र येथे रक्त तपासणी केली जात होती. परंतु सध्याच्या स्थितीत मी चौकशी केली असता ती तपासणी पूर्णपणे बंद दिसल्याचे दिसुन आले. याकरीता रुग्णांना खासगी रक्त तपासणी केद्रामध्ये जावे लागते. त्यामुळे गोर गरीब शेतकरी शेतमजूर अपंग बांधव यासारख्या अनेक जनतेला आर्थिक भुदंड सहन करावा लागतो. अगोदरच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सतत जिकडे तीकडे लाकडाऊन त्यामुळे गोर गरीब जनतेची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त भाराचा बोझा पळत आहे. करीता यापुर्वी आपल्या आरोग्य वीभाग कडुन स्थानीक पातळीवर रक्त चाचणी नमुने घेऊन त्यांना मदत करण्याचे धोरण होते. त्याच पद्धतीने यापुढे सुद्धा आपल्या तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामध्ये रक्त चाचणी नमुने घेण्यात यावे व, त्यांची योग्य तपासणी चाचणी अहवाल गरजु आनी गोर गरीब कुटुंबाला देण्यात यावी जेने करुन गोर गरीबांना योग्य औषधोपचार  मिळण्यायास मदत होईल. यावेळी निवेदन देतांना चिमुर पं. स. सभापती लता अरुण पिसे, पं. स. गटविकास अधिकारी राठोड साहेब, अपहर शेख, प्रदीप  कामडी, उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler