भटाळा येथील जिल्हा परिषद हायस्कूल शाळेच्या वरुण वर्गात गळतो धबधब्याच्या सारख पाणी
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
प्रवीण वाघे मो, 7038115037
वरोरा:-भटाळा येथील जिल्हा परिषद हायस्कूल ही शाळाआजुबाजूच्या परीसरातील प्रसिद्ध शाळा म्हणून ओळख असनारी आहे या शाळेमध्ये उच्चस्तरीय शिक्षण मिळत असत मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून या शाळेकडे प्रशासनाच चक्क दुर्लक्ष असल्यामुळे धबधब्यासारखी ही शाळा गळायला लागली याबाबतच्या समस्या शाळा व्यवस्थापन कमिटीने शासनापर्यंत पोहचविल्या या शाळेची दखल घेत शासनाने माहितीनुसार त्वरीत 18 लाख 74 हजार रुपयाची निवीधा निघाली असुन अचानक ती रद्द झाली आहे, दिवसेंदिवस शाळेची परीस्थिती ही गंभीर होत चालली आहे, आता यापुढे विद्यार्थ्यांनी वर्गात छत्री पकडून बसावेत की काय महत्त्वाच म्हणजे अश्या परिस्थितीत त्यातील शीक्षक स्टाप विद्यार्थींना शिकवायचे कसे आनी पालकांना शाळेबाबत ऊत्तर द्यायच कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे, याबाबत शाळा व्यवस्थापन कमिटीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे 15 दिवसा अगोदर निवेदनाद्वारे तक्रार केली होती परंतु त्या निवेदनाची याबद्दल कुठल्याच प्रकारची दखल घेण्यात आली नाही, यापुढे जर शाळेची हीच परीस्थिती राहीली तर विद्यार्थी व पालक वर्ग शाळा बंद पाडनार का असा प्रश्न त्या परीसरातील नागरीकांच्या मनात उपस्थित झाला आहे,