उसेगाव वाघेडा दरम्यान उमा नदीवर साकारणार पूल आमदार बंटी भांगडीया यांच्या प्रयत्नाला यश प्रहार वाहन चालक संघटना शाखा चिमुर तालुक्याच्या वतीने विषेश आभार.
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
प्रवीण वाघे मो, 7038115037
नेरी ते वाघेडा दरम्यान उमा नदीवरील 120 मीटर लांबीचा पूल मंजूर 6 कोटी 89 लक्ष निधी उपलब्ध नेरी उसेगाव वाघेडा व परिसरातील नागरिकांचे स्वप्न होणार साकार
चिमूर तालुक्यातील नेरीवरून जवळ असलेल्या उसेगाव आणि वाघेडा या गावादरम्यान उमा नदी असून या नदीवर मागील अनेक वर्षांपासून पूल नसल्यामुळे पावसाळ्यात या परिसरातील अनेक गावांचा नेरीशी संपर्क होत नव्हता तेव्हा नेरी वाघेडा उसेगाव वडसी आणि या परिसरातील नागरिकांनी या नदीवरील पूल व्हावा ही मागणी या क्षेत्राचे आमदार बंटीभाऊ भांगडीया साहेबांकडे केली तेव्हा आ बंटीभाऊ भांगडीया यांनी जोरदार प्रयत्न करीत या नदीवर पूल आणि या पुलासाठी निधी मंजूर करून घेतली परंतु शासनकडून निधी उपलब्ध होत नव्हती आता ही निधी उपलब्ध झाली असून या पुलासाठी 6कोटी 89 लाख मंजूर झाली हा 120 मिटर लांबीचा सर्वात मोटा पूल असून लवकरच या विकास कामाचे भूमिपूजन होऊन कामाला सुरुवात होणार आहे आणि या परिसरातील नागरिकांचे स्वप्न पूर्ण होणार आहे अशी माहिती नेरी जी प क्षेत्राचे प्रमुख संदिपभाऊ पिसे यांनी दिली
मागील अनेक वर्षांपासून या उमा नदीवरील पुलाचा प्रश्न प्रलंबित होता अनेक लोकप्रतिनिधी होऊन गेले परंतु कोणीही याकडे लक्ष दिले नाही अनेक मागण्या निवेदने सादर करण्यात आले पण हा प्रश्न सोडवू शकले नाही तेव्हा या क्षेत्राचे लोकप्रिय आमदार बंटीभाऊ यांनी हा पूल होणे काळाची गरज आहे असे महत्व ओळखून जोरदार प्रयत्न करून मंजूर करून घेतला होता परंतु शासनाने निधी उपलब्ध करून दिला नव्हता आता तो उपलब्ध झाला असून कामाला सुरुवात होणार आहे
नेरी हे या परिसरातील महत्वाची बाजारपेठ असून सर्व गाव खेडी व्यापार शिक्षण उद्योग बँकेचे व्यवहार कार्यालयीन कामकाज आणि इतर अनेक कामासाठी नेरीवर अवलंबून आहेत त्यामुळे वाघेडा वडशी विहिरगाव पळसगाव पिपरडा आणि या परिसरातलागून असलेल्या अनेक गावांचा नेरीशी संपर्क तुटला होता तसेच त्यांना नेरिला येण्यासाठी चिमुरवरून किंवा इतर खेडी गावातून नेरिला यावे लागत असे तसेच नेरी व परिसरातील नागरिकांना या गावांना जाताना अनेक खेडी गावांना चकरा मारून जावे लागत असे तसेच हा मार्ग शिंदेवाही मूल कडे जाण्यासाठी सोयीस्कर असून या पुलामुळे दुर्लक्षित झाला होता आणि आतापर्यंत न चाललेली वाहतूक या पुलाचे काम पूर्ण झाल्यावर सुरू होऊन या परिसरातील गावांना महत्त्व प्राप्त होईल तसेच या परिसरातील सर्व गावे या पुलामुळे नेरी शी जोडले जातील बाजारपेठ आणि व्यापारात चालना मिळून विकास साधला जाईल तसेच शालेय विद्यार्थीना शिक्षणाची दारे खुली होतील त्यामुळे काळाची गरज ओळखून आमदार बंटीभाऊ भंगडीयानी अथक परिश्रम घेऊन हा उमा नदीवरील पुलाला मंजुरी मिळवून देत यश प्राप्त केले लवकरच या पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन होऊन कामाला सुरुवात होणार आहे तेव्हा नेरी येथील व्यापारी वर्गानी आणि परिसरातील गावकऱ्यांनी आमदार बंटीभाऊ चे अभिनंदन करून आभार व्यक्त केला आहे
