वरोरा शेगांव चिमूर राष्ट्रीय महामार्गाचा संपर्क तुटला
वरोरा तालुका ग्रामीण प्रतिनिधी
राकेश भूतकर मो.न.8308264808
चिमूर वरोरा राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या कित्येक दिवसापासून सुरू असुन अजून पर्यंत एस. आर. के. कंपनीचे कामाकडे दुर्लक्ष होत असून या कंपनीला प्रहार जनशक्ती पक्षाशातर्फे कित्येक वेळा निवेदन देऊन उन्हाळ्यात संपूर्ण रोडवरील पुलाचे बांधकाम पूर्ण करून घ्यावे अशे वेळोवेळी सांगण्यात आले.तरी सुद्धा या कंपनीने प्रत्येकदा दुर्लक्ष केले होते. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार काल रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे पोहे येथील मध्यम आकाराचे तलाव पूर्ण फुल झाल्याने व छोटे मोठे कालवे तुडूंब भरल्याने पाणी परिसरातील शेतात व गोठयात शिरले. त्यामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचा राग अनावर झाला त्यामुळे एस. आर. के. कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलवून पूल जवळील केलेला रोड फोडून पाणी जाण्यासाठी मार्ग मोकळा केला. त्यामूळे काही तासासाठी रस्ता बंद केल्याने विविध गावातील नागरिकानंमध्ये कंपनी विरोधात रोष निर्माण झाला.यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते अमोल दातारकर,आकाश नाकाडे,विलास वाघमारे,नरेंद्र दातारकर,कैलास वाघमारे,शंकर वाघमारे, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते...
