बोरगाव येथील महिलेवर प्राणघातक हल्ला
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
सतीश नेवारे 9823935413
गोंडपिपरी- महिलांवरील अन्याय अत्याचार अधिक जोमाने डोकेवर काढत असून कायद्याची भीती राहिलेली दिसत नसून गुन्हेगारी प्रवृत्तीने डोके वर काढल्याचे चित्र राज्यभर पाहायला मिळत आहे संपूर्ण देशभरात हीच परिस्थिती आहे,गोंडपिपरी तालुक्यातील बोरगाव येथील दर्शना झाडे वय (55) वर्ष या महिलेवर संघमित्रा फूलझले वय (35) वर्ष या युवकाने भर दिवसा धारदार शस्त्राने हल्ला चढविला. पीडित महिला व आरोपी युवक हे एकमेकांच्या शेजारी राहणारे आहेत त्यामुळे जुन्या घरगुती वादातून हा जिवघेना हल्ला झाल्याचे बोलले जात आहे. महिलेच्या कानाला आणि हाताला गंभीर मार असून तिच्यावर ग्रामीण रुग्णालय येथे उपचार सुरू आहे . घटनेची माहिती पोलिसांना होताच घटनास्थळ गाठून आरोपीला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे,
