गाव कामगार पोलीस पाटील संघ चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणी गठीत
चिमूर तालुका प्रतिनिधि
सचिन वाघे मो.9673757006
गाव कामगार पोलीस पाटील संघ चंद्रपूर ची 1सप्टेंबर2021ला जिल्ह्याचे अध्यक्ष योगेश्वर ठाकरे यांचे अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीत जुनी कार्यकारिणी बरखास्त करून नव्याने कार्यकारिणी गठीत करण्यात आली
यात गाव कामगार पोलीस पाटील संघ चंद्रपूर च्या जिल्हा अध्यक्ष पदी नरेंद्र गटाने याची बिनविरोध निवड करण्यात आली सचिव पदी हरिभाऊ पहानपटे तर उपाध्यक्ष पदी नितेश वाटोळे कार्याध्यक्ष म्हणून रामटेके संघटक म्हणून वारे पाटील जिवती सहसचिव पदी गोपाळ ठिकरे व प्रसिध्दी प्रमुख म्हणून दिपक पाटील यांची निवड करण्यात आली तसेच मार्गदर्शक म्हणून योगेश्वर ठाकरे यांची पाचवर्षा करिता बिनविरोध निवड करण्यात आली या आढावा बैठकी करिता सर्व तालुक्यातील गावकामगार पोलीस संघाचे अध्यक्षयांचे उपस्थितीत ही जिल्हा कार्यकारिणी गठीत करण्यात आली अशी माहिती प्रसिद्धी प्रमूख दिपक पाटिल यांनी दिली

