नरभक्षक वाघाच्या बंदोबस्ताच्या मागणी करिता मुख्य वनसंरक्षक अधिकारी कार्यालया धडक, ढोल बजाव मोर्चा.
आंदोलनातून जनतेचा तीव्र जन आक्रोश.
गडचिरोली शहर प्रतिनिधी
संदीप कांबळे 9421318021
नरभक्षक वाघाच्या बंदोबस्ता करिता भारतीय जनसंसद व संतप्त नागरिकांचा मुख्य वनसंरक्षक कार्यालयावर ढोल वाजवत मोर्चा निघाला,लोकांचा तीव्र आक्रोश बघून वनाधिकाऱ्याचे धाबे दणाणले,त्यामुडे ढोल बजाव गडचिरोली,आंदोलन चर्चेचा विषय ठरला, गडचिरोली जिल्यात माणसावर हल्ला करीत प्रचंड दहशत माजवणाऱ्या नरभक्षक वाघाने वनव्याप्त कार्यक्षेत्रात व शेतकरी बांधवांच्या शेता लगत 14 निष्पाप लोकांचे बळी घेतले,एवढेच नव्हे तर शेतकरी कुटुंबातील गाई ,म्हशी ,बकऱ्या फस्त केल्या त्यामुडे परिसरातील जनता वाघाच्या दहशतीने भयभीत झाली,परिणामी जनतेने शेतावर जाणे सुद्धा बंद केले,
नरभक्षी वाघाला बंद करण्यासाठी भारतीय जनसंसद ,परिसरातील अनेक ग्रामपंचायती व जनतेच्या वतीने दिनांक 1/9/2021 ते 4/9/2021 पर्यंत ठिय्या व जेलभरो आंदोलन करण्यात आले होते तेव्हा गडचिरोलीच्या वनरक्षकांनी नरभक्षक वाघाला जेरबंद करण्याचे आश्वासन देऊनही निष्क्रिय व निष्काळजीपणा करणाऱ्या वनविभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना वाघाला जेरबंद करिता अपयश आल्याने आणखी किती बळी घेणार असा प्रश्न जनतेमध्ये निर्माण झाला असून पुन्हा एकदा शासन ,प्रशासनाचे व जिल्यातील जनतेचे लक्ष वेधण्याकरिता गडचिरोली इंदिरा गांधी चौकातून तर मुख्य वनसंरक्षक कार्यालयावर भारतीय जनसंसद भ्रष्टचार विरोधी जन आंदोलन ,परिसरातील सर्व ग्रामपंचायती व संतप्त नागरिकांनी मुख्य वनसंरक्षक कार्यालयावर धडक दिली या मोर्च्यांचे नेतृत्व देवाजी तोफा जेष्ठ समाजसेवक ,डॉ, शिवनाथ कुंभारे राज्य समिती विश्वस्त भ्रष्टाचार विरोधी जण आंदोलन,भारतीय जनसंसदेचे जिल्हाध्यक्ष श्री विजय खरवडे, संसदेचे जिल्हा प्रमुख,योगेश कुडवे,रमेश बांगरे,नीलकंठ संडोकर ,जागृत युवा मंच चे अध्यक्ष राहुल पेंढारकर या मोर्चा प्रसंगी महत्वाची बाब म्हणजेच दोन युवक वाघाच्या वेशभूषेत नाचत सहभागी झाली होती व परिसरातील नागरिकांच्या वतीने राजगाठा चक,धूनदेशिवणी,गोगाव,महादवाडी,जेप्रा ,दिभना, चुरचुरा,भिकरमौशी,अमिर्झा परिसरातील जनता खूप मोठ्या प्रमाणात आली होती,
वृत्त लिहेपर्यंत मोर्चेकरी व मुख्य वनसंरक्षक कार्यालय यांच्यात चर्चा सुरू होती,

