गुजरी बाजार येथे घाणीचे साम्राज्य. नगर परिषदेने त्वरित सफाई करावी नाहीतर करणार आप पार्टी कचरा फेको आंदोलन.

गुजरी बाजार येथे घाणीचे साम्राज्य. नगर परिषदेने त्वरित सफाई करावी नाहीतर करणार आप पार्टी कचरा फेको आंदोलन.

गडचिरोली शहर प्रतिनिधी 

संदीप कांबळे 9421318021




 गडचिरोली शहरात गुजरी बाजार परिसरात इतक्या मोठ्या प्रमाणात घाण पसरली आहे की जणू गटर परिसर आहे की काय असा भास होतो, श्री बाळकृष्ण सावसाकडे आप पार्टी जिल्हा अध्यक्ष यांनी आज पाहणी केली असता दिसून आले.

शहराच्या अगदी मध्यभागी असलेल्या ठिकाणी गुजरी बाजार आहे,अश्या गर्दीच्या ठिकाणी गुजरी बाजार भरतो,अश्या ठिकाणी शहरातील रोज हजारो लोक भाजीपाला घेण्याकरिता इथं येत असतात,अश्या घाणीच्या साम्राज्या मुडे लोकांच्या आरोग्य विषयी तक्रारी येतात ,ती घाण नाहीशी नाही केली तर हजारो लोकांचे आरोग्य खराब होतील ,या व विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याचा पण धोका आहे,म्हणूनच आप पार्टी चे सर्वेसर्वा श्री बाळकृष्ण सावसाकडे यांनी पाहणी करून लवकरात लवकर नगर परिषद प्रशासनाने ती दुर्गंधी त्वरित सफाई करावी नाहीतर आप पार्टी कचरा फेको आंदोलन करून ती दुर्गंधी साफ करेल असा इशारा नगर परिषद प्रशासनाला दिला आहे.

गुजरी बाजारातील दुर्गंधी पाहिली तर सर्व सामान्य माणसाला असा प्रश्न पळतो की स्वचतेवर नगर परिषद प्रशासन गांभीर्य पणे पाहतो की नाही.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler