अपंगांना न्याय व स्थानीक समस्यांना निपटारा करण्यासाठी नेरी ग्रामपंचायत सामोर प्रहार संघटना करनार डफली बजाव आंदोलन
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
प्रवीण वाघे मो, 7038115037
चिमुर:-नेरी येथील झोपेचे सोंग घेतलेल्या स्थानिक स्वराज्यसंस्था ग्रामपंचायतीला जागे करण्यासाठी दि 16 सप्टेंबर ला प्रहार संघटना डफली बाजाव आंदोलन करून अपंगांना आणि इतर समस्यांच्या निपटारा करण्यासाठी आंदोलन करणार आहे
शासनाने अपंगांचा विकास करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत ला अपंगांसाठी वार्षिक ५/टक्के निधी उपलब्ध करून त्यांना सामान्य फंडातून किंवा वित्त आयोगाच्या आराखड्यातुन मंजूर करून द्यायचा असतो आणि तो सर्वनाचा बंधनकारक असतो आणि अपंग बांधवांसाठी दिल्या जातो मात्र नेरी ग्रामपंचायत कडुन गेल्या पाच ते सात वर्षापासून नेरी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या अपंग बांधवांना आजपर्यंत १रु ही मिळाला नाही एवढ्या वर्षांचा निधी कुठे गेला हा यक्ष प्रश्न आहे? नेमका निधी गेला कुठे? असा सवाल नागरिक करीत आहेत तसेच या ग्रामपंचायतीचे अनेक समस्या आहेत त्याचा अजूनही निपटारा झाला नाही यात गांधी वार्ड क्र, ४, येथील गेल्या कित्येक वर्षांपासून त्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे याबाबत ग्रामपंचायतला अनेक दा सुचना दिली, मात्र आजपर्यंत त्या परीसरातील नागरीकांना गाजरच मिळाले आहे
त्याचप्रमाणे प्राथमीक आरोग्य केंद्र नेरी हे मोठे आरोग्य केंद्र आहे या केंद्राला ६ उपकेंद्र जोडलेले आहे आजुबाजूच्या परीसरातील अनेक गावखेडे या प्राथमिक उपकेद्रावर अवलंबून आहेत मात्र तीथे एमबीबीएस डाॅक्टरच नाही सध्या बिएचएमएस डाॅ, कार्यारत आहे, पन रात्री ला तर कुणीही नसतो, पिण्याच्या पाण्याचे मशीन ही कित्येक दिवसापासून बंद आहे मात्र त्याकडे चक्क दुर्लक्ष होत आहे, पन दुरस्ती करायला शासनाकडे पैसे नाहीत काय? अॅबुलंस ड्रायव्हर हा मद्यपान करून रुग्नासोबत असभ्य भाषेत बोलतो या आरोग्य केंद्रात साधी ब्लड टेस्टची व्यवस्था सुद्धा नाही पुर्वी होती मात्र एक्सफायर झालेल्या किटा वापरत होते त्यामुळे अनेकांची रीपोर्ट कधी निगेटिव्ह तर कधी पाॅझीटीव्ह दाखवून अनेक रुग्नांना आजपर्यंत त्रास सहन करावा लागला आहे, यासारख्या अनेक समस्या या प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी येथे आहेत यासाठी कुणीही आवाज उठवायला तयार नाहीत, याबाबत आता माननीय राज्य मंत्री बच्चु भाऊ कडु यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार संघटना आक्रमक होऊन प्रहार च्या माध्यमातून अनेक निवेदन दिले मात्र यावर प्रशासन पुर्ण पने दुर्लक्ष करीत आहे करीता या हुकुमशाही च्या विरोधात झोपलेल्याचे सोंग घेतलेल्या निष्क्रीय प्रशासनाला जागे करन्यासाठी गोर गरीब शेतकरी शेतमजूर अपंग बांधव यांच्यासाठी प्रहार जनशक्ती तथा प्रहार वाहन चालक संघटनेच्या वतीने दि,16सप्टेबर 2020ला ग्रामपंचायत नेरी सामोर प्रहार संघटना मैदानावर उतरून खालीलप्रमाणे मागण्या घेऊन आंदोलन करणार आहे
नेरी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या ज्यांना आजपर्यंत निधी मिळाला नाही त्यांना ५ टक्के निधी हा त्वरीत वाटत करन्यात यावा, गांधी वार्ड क्र, ४ बौद्ध विहाराकडुन नवरगाव चिमुर रस्त्याला जुळणारा हा रस्ता संपूर्ण चिखलमय झाला असून त्या रस्त्याचे बांधकाम त्वरीत चालु करावे,
त्याचप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी येथे एमबीबीएस डाॅक्टर त्वरीत सेवेत रुजू करुन द्यावे, तीथे साफसफाई कामगार हा नियमित शासनाचा असावा, रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना फिल्टर केलेले स्वच्छ पिण्याचे पाणी नियमित असावेत, ॲम्बुलन्स वाहन चालक हा मद्यपान न करणारा असावा, औषध निर्माण अधिकारी हे पद त्वरीत भरावे, अश्या विविध मागण्या घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने डफली बजाव आंदोलन करण्यात येणार आहे,
