जि.प.चंद्रपूरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, मा.डॉ.मित्ताली सेठी मॅडम यांची पंचायत समिती, ब्रम्हपुरीला भेट व विकास कामांचा आढावा.
तालूका प्रतिनिधि ब्रम्हपुरी
मनोज अगळे
9765874115
दिनांक ०१.०९.२०२१ रोज बुधवारला पंचायत समिती ब्रम्हपुरीचे कर्मयोगी संत गाडगेबाबा सभागृह येथे मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, मा.डॉ.मित्ताली सेठी मॅडम, डॉ. शिरीष रामटेके, गट विकास अधिकारी, पंचायत समिती,ब्रम्हपुरी, डॉ. दुधपचारे तालुका वैद्यकिय अधिकारी, श्रीमती माधुरी भंडारे, बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे उपस्थितीत पंचायत समिती ब्रम्हपुरीचे विकास कामांचा आढावा घेण्यात आला.
सदर आढावा सभेला सर्व विभाग प्रमुख, विस्तार अधिकारी पंचायत, पंचायत समिती चे सर्व कर्मचारी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, अभियंता बांधकाम, सिंचाई विभाग,तसेच वैद्यकिय अधिकारी उपस्थित होते. सदर आढावा सभेत सर्व विभागांचा आढावा घेऊन प्रलंबित कामे पूर्ण करण्याच्या सुचना दिल्यात. त्याचप्रमाणे ग्रामसेवक यांना प्रलबिंत विद्युत देयका संदर्भात मार्गदर्शन केले. वैद्यकिय अधिकारी यांना कोविड- 19 ची तिसऱ्या लाटेच्या पुर्वतयारी कोविडची टेस्ट वाढविण्यास सांगण्यात आले.
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांचे हस्ते वृक्षारोपन करण्यात आले, महाराष्ट्र राज्य ग्रामिण जिवनोन्नती अभियान अंतर्गत हिराई मार्ट ला भेट दिली.
