ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार असलेला 16 वर्षीय युवक गंभीर जख्मी
उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले,
गडचिरोली प्रतिनिधी
संदीप कांबळे 9421318021
शहरातील चामोर्शी बसस्थानक जवळ एका ट्रक च्या धडकेत दुचाकी स्वार असलेल्या युवक गंभीर जखमी झाल्याची दुर्दवी घटना आज सा. 4 वा.सुमारास घडली. गडचिरोली शहरातील प्रतिष्टीत व्यापारी उमेश काबरा, यांचा मुलगा लखन उमेश काबरा,हे
जखमी युवकाचे नाव आहे, सामान्य रुग्णालय गडचिरोली येथून उपचारासाठी त्याला नागपूर येथे हलवण्यात आले आहे,
MH 33 AB 1308या दुचाकी वाहनाने आपल्या खाजगी काम काजाकरिता जात असताना, ट्रक ने मागच्या साईडने जोरदार धडक दिल्याने गंभीर रित्या
जखमी झालें आहे,
सदर घटनेची माहिती गडचिरोली पोलीस विभागाला देण्यात आली असता घटनास्थळी पोलिसांची टिम हजर झाली असून मौका पंचनामा करून गडचिरोली रुग्णालयात पाठविण्यात आला असून पुढील तपास गडचिरोली पोलीस करीत आहेत.