लाच घेताना दोन पोलिसांना चंद्रपूर ACB ने केले रंगेहात अटक

 लाच घेताना दोन पोलिसांना चंद्रपूर ACB ने केले रंगेहात अटक


महाराष्ट्र न्यूज

गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी

सतीश नेवारे



गोंडपिपरी :- अवैध दारू विक्री करण्यासाठी लाज मागणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील लाटी उपपोलीस ठाण्यातील दोन पोलिसांना चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 29 हजार 500 रुपयाची लाच घेतांना रंगेहात अटक केले आहे.

     मिलिंद पारडकर, संजू रतनकर असे लाचखोर पोलिसांचे नाव आहेत.

गोंडपिपरी तालुक्यातील लाटी परिसरात अवैध दारू विक्री सुरू ठेवण्यासाठी लाटी येथील काही पोलीस कर्मचारी 18 हजार रुपये महिना देण्यासाठी पैशाचा तगादा लावत होते. व दोन महिन्याचे 36 हजार रुपये देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने तक्रारदाराने याची माहिती लाज लुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून दोन्ही आरोपींना 29 हजार 500 रुपयाची लाच घेताना रंगेहाथ अटक केली.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक अविनाश भामरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली,




टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler