अस्वल झाली वाघावर आक्रमक तर वाघ झाला अस्वल समोर नतमस्तक

अस्वल झाली वाघावर आक्रमक तर वाघ झाला अस्वल समोर नतमस्तक


चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

प्रवीण वाघे



ताडोबातील वाघाने अडविला अस्वलीचा रस्ता

ताडोबाती व्हिडीओ झाला व्हायरल

प्रमोद राऊत खडसंगी


          जगप्रसिद्ध ताडोबात प्रत्येक वेळी काही ना काही वेगळे घडत असते. यात वन्यप्राणी पर्यटकांना वेगवेगळ्या पोज देत असल्याने पर्यटकसुद्धा भारावून जात असतात. आज सुद्धा ताडोबात अस्वल वाघ एकाच रस्त्यावर समोरासमोर आल्याने अस्वल आपल्या रस्त्याने सरळ जात असतांना ताडोबातील वाघाने अस्वलीचा रस्ता अडवून धरला असल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे. यामुळं अस्वल वाघावर दोन्ही पाय वर करून उभी झाली असता अस्वल समोर जंगल चा राजा नतमस्तक झाल्याचे व्हिडीओ मधून दिसून येत आहे. ताडोबातील या पोज मुळंच विदेशी पर्यटक आनंदित होत असतात.

         वाघ (tiger) हा नेहमी जंगलातील इतर प्राण्यांवर हल्ला करत असतो. तसेच वाघाच्या हल्ल्यामध्ये अनेकांचे मृत्यू झाल्याच्या घटना देखील घडतात. मात्र, सध्या एक व्हिडिओ समोर आला असून यामध्ये वाघ आणि अस्वल दोन्ही दिसत आहेत. अस्वल समोर येताच वाघ घाबरून खाली बसतो असे या व्हिडिओमधून दिसत आहे. चंद्रपुरातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील  हा व्हिडिओ आहे.

चंद्रपुरातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या जास्त आहे. त्यामुळे प्रकल्पात नेहमीच वाघाचे दर्शन होत असते. त्यामुळे देश-विदेशातील पर्यटक ताडोबाला भेट देतात. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे वाघ त्यांना दर्शन देखील देतो. याच परिसरात वाघाच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्याच्या घटना जवळपास दररोज घडतात. पण, आक्रमक असणाऱ्या वाघाने मात्र अस्वालासमोर शरणागती पत्करली असल्याचे दिसतेय. कारण, अस्वल हा देखील आक्रमक प्राणी आहे. अस्वल कोणत्या प्राण्यावर किंवा माणसावर हल्ला करून त्यांना अक्षरशः फोडून काढतो. त्यामुळे हे आक्रमक अस्वल पुढे दिसताच वाघ चक्क घाबरून खाली बसला आणि त्याने वाघासमोर शरणागती पत्करली. पर्यटकांच्या आवाज येताच अस्वलाने जंगलात धूम ठोकली. त्यानंतर घाबरलेला वाघ परत मार्गस्थ झाला. हे सर्व दृश्य पर्यटकांनी ल्या कॅमेरामध्ये कैद केले.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler