चार महिन्या पासून कोरोना योद्धा मानधना च्या प्रतीक्षेत
वरोरा तालुका प्रतिनिधी
गणेश उराडे 8928860058
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कार्यरत वैदयकीय अधिकाऱ्यांना गेल्या चार महिन्या पासून मानधन मिळाले नाही. निधी नसल्याचे कारण जिल्हा परिषद देत आहे वैद्यकीय अधिकाऱ्यांना अनेक अडचणीला समोर जावे लागत आहे. मानधन मिळत नसल्याने अनेक अधिकारी नोकरी सोडायच्या विचारात आहे अशी माहिती होत आहे. विशेष बाब मणजे कोरोनाच्या लाटेत या योद्धानी आपली कामगिरी उत्तम रित्या बजावली आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाअंतर्गत 58 प्राथमिक आरोग्य केंद्र येतात. या आरोग्य केंद्रात पाहिजे त्या प्रमानात आरोग्य कर्मचारी नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. मानधन मिळत नसल्याने वैद्यकीय अधिकारी सेवा सोडून जाण्याच्या तयारीत आहे दरम्यान जिल्हा परिषदे चे सदस्य खोजराज मरस्कोले यांनी आरोग्य समितीच्या बैठकीत हा मुद्दा उचलून धरला त्यावर आरोग्य विभागाने लवकरच मानधनाचा विषय मार्गी लावू असे अस्वासन दिले.
