ई-पीक पाहणी अँप्स रद्द करण्याबाबत शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी मार्फत कृषी मंत्री,व पालक मंत्री यांना निवेदन,,

 ई-पीक पाहणी अँप्स रद्द करण्याबाबत शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी मार्फत कृषी मंत्री,व पालक मंत्री यांना निवेदन,,


गडचिरोली प्रतिनिधी 

संदीप कांबळे 9421318021




        गडचिरोली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र सरकारने ई पीक अँप्स सुरू केले असून शेती ७/१२फेरफार या घोषणावाक्याचाआधार शेतात असलेले पीक नोंद करताना खूप नाहक त्रास शेतकऱ्यांना होत आहे परिणामी ही ई पीक पाहणी अँप्स तात्काळ रद्द करावी,शासनाने कार्यान्वित होत असलेल्या शेतकऱ्यांना मोबाइल द्वारे पिकांची नोंदणी करायची असून लाभार्त्याचे मूल्याकन केल्या जाण्याची निदर्शने केली आहे मात्र गडचिरोली सारख्या अति दुर्गम भागात तर इंटरनेट सेवा वारंवार खंडित असते,तसेच काही ठिकाणी मोबाईल टॉवर पण उपलब्ध नाहीत,

अश्या ठिकाणी शेतकऱ्यांची नोंदी  सुद्धा होत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे,काही शेतकऱ्यांनी नोंदी केल्या असल्या तरी बरेच शेतकरी या नोंदी पासून वंचित आहेत ,परिणामी शासनाने हा प्रकार लक्षात घेता मोबाईल वरून होणारी रद्द करून ७/१२ वर तलाठी ,कृषीसेवक यांच्या मार्फत नोंदी करण्याचे आदेश काढावेत असे निवेदनाद्वारे विंनंती करण्यात आली,

निवेदन देते प्रसंगी श्री मनोहर राव हेपट साहेब,श्री सचिन दादा भुसारी,उमेश मरारे हे हजर होते,

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler