नेरीचे वन क्षेञसहाय्यक रासेकर हे मुख्यालयी राहत नसल्यामुळे अनेकांची कामे खोळंबली.
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
प्रवीण वाघे मो, 7038115037
चिमुर:- चिमूर तालुक्यातील नेरी येथे वन क्षेञसहाय्यकाचे कार्यालय असुन येथील अधिकारी मुख्यालयी राहत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची व नागरीकांची कामे खोळंबली आहेत.
नेरी येथील वनवीभागाचे क्षेञसहाय्यकाचे कार्यालया अंतर्गत तीन बिट येत असुन यामध्ये बोडधा , काजळसर , गोदेंडा हे आहेत . तळोधी वन परीक्षेञ कार्यालयाच्या अंतर्गत हे वनक्षेञसहाय्यकाचे कामकाज चालत असते . या अगोदरचे नेरी वनविभागाचे क्षेञ सहाय्यक मुख्यालयी राहत होते . पण आता सिंदेवाही तालुक्यातुन आलेले नवीन क्षेञसहाय्यक मुख्यालयी राहत नाहीत . शेतकरी व नागरीक कार्यालयाची भेट घेउन बीना कामाविना वापस जात आहेत . वन्यप्राण्यांनी शेतपिकांची नुकसान केलेल्या शेतकऱ्यांकडुन ५०० रूपये वसुल करीत असल्याचे शेतकऱ्याकडुन सांगण्यात येत आहे .
त्यामुळे या वनक्षेञसहाय्यकाला मुख्यालयी राहण्यासाठी वरीष्ठ अधिकाऱ्याकडुन बजावण्यात यावे व शेतकऱ्यांची होणारी आर्थीक पिळवणुक थांबवावी अशी मागणी शेतकरी व नागरीक करीत आहेत .
त्याचप्रमाणे वनविभागातील,नेरी येथील काजळसर, बोधडा, गोदोडा,
बीटातीलक्षेत्र सहाय्यक,
रासेकर साहेब हे लोकांकडून
शेत शिवारातील पिकांचे पंचनामे करण्याचे पैसे मागतात...
मौजा लोहारा येथील एका नागरिका सोबत घडलेला प्रकार...
ऑडीओ व व्हिडीओ क्लिप सुद्धा व्हायरल झाली आहे.