विविध समस्यांनी ग्रासलेल्या आपादग्रस्ताना आ बंटीभाऊ भांगडीया कडून आर्थिक मदत
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
प्रवीण वाघे
प्रतिनिधी नेरी। येथून जवळ असलेल्या बोथली आणि खुंटाळा येथील आपदग्रस्त ना आ बंटी भांगडीया कडून आर्थिक मदत देऊन त्यांच्या कुटूंबाला मदतीचा हात दिला
खुंटाळा येथील कचरू भेंडारे व वनिता गावतुरे हे मागील अनेक दिवसांपासून आजारी होते त्यांचा उपचार सुरू होता परंतु पुढील उपचार करण्यासाठी त्यांच्या कडे आर्थिक कुमुक नसल्यामुळे त्यांच्या उपचारात बाधा निर्माण झाली होती ही बाब स्थानिक कार्यकर्त्यांना माहिती झाली तेव्हा त्यांनी स्वतः त्यांच्या घरी जाऊन विचारपूस केली तसेच बोथली येथील गिरीजा चोधारी यांची तब्येत मागील अनेक दिवसांपासून खराब झाली होती अनेक डॉकटर कडे नेले परंतु आराम झाला नाही औषध घेतल्याने आराम पडत असे त्यामुळे पुढील उपचारासाठी पैसे नसल्याने त्यांनी ही बाब कार्यकर्त्यांच्या निदर्शनास येताच स्थानिक कार्यकर्त्यांनी भाजपा तालुका अध्यक्ष राजू पा झाडे व रमेश कंचरलावार याना सांगितली तेव्हा त्यांनी तात्काळ या क्षेत्राचे लोकप्रिय आमदार बंटीभाऊ भांगडीया याना कळविले तेव्हा क्षणाचाही विलंब न करता समाजकार्यात पुढे असलेले दिंनदलितांचे व सवरसमान्यांचे अश्रु पुसण्याचे कार्य हाती घेतलेले समाज सेवक लोकप्रिय आमदार बंटीभाऊ यांनी तात्काळ मदत जाहीर करून कार्यकर्त्यांच्या हस्ते मदत पाठवीत आपदग्रस्त ना वितरित केली
यावेळी मदत देताना विलास कोराम तालुका महामंत्री डाकेश्वर गावंडे भीमराव कामडी गुरुदास सोनवणे गंगाधर श्रीरामे तानाजी चौखे आणि सर्व भाजपा कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते