"पीएम किसान योजनेची व्याप्ती वाढणार"
(महाराष्ट्र न्यूज)
केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा फायदा मिळत असलेल्या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू असून , त्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात . तीन टप्प्यात दोन हजार रुपये असे या योजनेचे स्वरूप आहे . आता दोन हजार रुपयांऐवजी पाच हजार रुपयांचा हप्ता मिळणार आहे .
म्हणजे आधी दोन हजारांचा हप्ता मिळायचा , तो आता पाच हजार रुपयांचा राहणार आहे . योजनेत नोंदणी या करण्यासाठी आधार कार्ड , ओळख पत्र , वयाचा दाखला , उत्पन्नाचा दाखला , बँक पासबुक , मोबाईल क्रमांक आणि पासपोर्ट साईजचा एक फोटो आवश्यक आहे . पीएम किसान योजनेचे आतापर्यंत नऊ हप्ते जमा झाले असून , येत्या डिसेंबर महिन्यात दहावा हप्ता जमा होणार आहे .