अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करा
ग्रा प सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ता राकेश गोलेपल्लीवार याची मागणी
कापून झालेले व कापणीला आलेल्या धान पिकांचे प्रचंड नुकसान
चंद्रपुर जिल्ह्यात मागील ३-४ दिवसांपासून सातत्याने अवकाळी पाऊस
नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यात येवुन नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी
उमेश गोलेपल्लीवार
तालुका प्रतिनिधी सावली
दिनांक १५ नोव्हेंबर २०२१ चंद्रपुर
धानाचे पीक कापणीला आलेले असताना व काही पीक मोठया प्रमाणावर कापून झालेले असताना ऐन वेळेवर अवकाळी पाऊस आल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे त्यामुळे तातडीने अशा नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्याना लवकरात लवकर आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी ग्रा प सदस्य राकेश गोलेपल्लीवार यांनी केली
चंद्रपुरजिल्ह्यातील सावली तालुका हा मोठा धान पिक घेणारा क्षेत्र असुन शेतकऱ्यांनी धानाच्या पिकाची कापणी केली असून जमा करण्याचे काम सुरू होते. तसेच मोठ्या प्रमाणात धान कापणीचे कामही सुरू होते. माञ अचानकपणे मागील २-३ दिवसांपासून सातत्याने अवकाळी पाऊस सुरू असून कापलेले धानाचे पीक पाण्यात सापडले त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे .शासनाने अशा नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी ग्रा प सदस्य राकेश गोलपल्लीवार यांनी केली.